प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
माणसांच्या आयुष्यात निसर्ग किती महत्वाचा आहे हे कोव्हीड -19 च्या भंयकर साथीने अधोरेखीत केले.स्वार्थासाठी लाकुड तोड करुन आपणास लागणारा अॉक्सिजनच संपवत आहोत. अॉक्सिजनच्या एक रेणु जिवंत असण्यासाठी किती महत्वाचा आहे हे अॉक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेने जाणवले होते.
हिच वृक्षांची सामाजिकच नव्हे तर अत्यावश्यक जबाबदारी केज चे बाबुरावजी आडसकर महाविद्यालय जपत आहे.12 जुलै 2017 मध्ये अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभ हस्ते केलेले वृक्षारोपन आज बाळसेदार होवुन चार वर्षाचे झाल्यामुळे महाविद्यालयात "वृक्षांचा वाढदिवस" मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
केज शहरातील एक महत्वाचे ग्रीन पार्क म्हणुन ही केज मधील नागरीक मॉर्निंग वॉक साठी हे स्थळ निवडत आहे.या वनस्पती उद्यानात गुलमोहर ,करंजी,पिंपळ,बहावा,
सप्तपर्णी,आंबा ,चिंच,अशोक ,आपटा,औदुंबर , कदंब इत्यादी वृक्ष संपदा आहे.
या सर्व वनराईसाठी बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधवराव फावडे आणि रासेयो अधिकारी अनुक्रमे डॉ.ए.व्ही. गायकवाड ,डॉ.टी.एस.बिडवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

