shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनसे विद्यार्थी सेनेचे शिर्डी शहराध्यक्ष सौरभ हाडवळे आणि सामाजिक कार्यकर्ते योहान गायकवाड यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश..!!



शिर्डी शहर प्रतिनिधी : 
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत मनसे विद्यार्थी सेनेचे शिर्डी शहराध्यक्ष सौरभ हाडवळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

कोरोना काळात शिर्डी शहरामध्ये नागरिकांसाठी ५०० औषधी कीट, ३०० वाफेचे मशीन, पोलिसांना फेसशिल्डच वाटप केले असून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर, चित्रकला स्पर्धा यासारखी प्रोत्साहन देणारे उपक्रम घेतले आहेत. शिर्डी शहर काँग्रेसमध्ये सौरभ आणि योहान यांचा योग्य सन्मान करून त्यांना योग्य जबाबदारी दिली जातील असे सचिन चौगुले म्हणाले. यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष सचिन चौगुले, मा.नगरसेवक सुरेश आरने, शहर उपाध्यक्ष आरबाज कादरी, मोहसीन सय्यद, ता.यु. उपाध्यक्ष मदन मोकाटे, ऍड अविनाश शेजवळ, मंगेश खाकाळे, शहर संघटक सुवरनेश् साबळे, समीर शेख, कृष्णा गायकवाड, शिवाजी भोंडगे आदि उपस्थित होते.
close