shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान देवळाली प्रवरा यांच्या कडून डॉ. सुनिता पोटे यांचा सत्कार...!!

शिरूर, पुणे : दि.14/07/2021. : 
शिरूर येथील प्रसिद्ध मीरा नर्सिंग होम यांचे संचालक डॉ. सुनिता पोटे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच लोकमत वूमन अचिव्हर ऑफ मुंबई 2021 हा नामांकित अवॉर्ड घोषित झाला आहे.

सदर प्रसंगी बोलताना डॉ. सुनिता म्हणाल्या कि महिलांचा अश्या प्रकारे सम्मान केल्यास माझ्या सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचे मनोबल नक्की वाढेल तसेच माझ्या सारख्या अनेक महिला सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल, बोलताना त्यांनी सर्व श्रेय त्यांना खंबीर साथ देणारे त्यांचे पती डॉ. संतोष पोटे यांना दिले. 

शिरूर तालुक्यातील डॉ. सुनिता यांना हा पुरस्कार मिळाल्याचे शिरूर परिसरात कळताच सर्वांना अभिमान वाटला व डॉ. सुनिता यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी डॉ. प्रविण बाळासाहेब चोळके व डॉ. योगिता प्रविण चोळके, अध्यक्ष, समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा, सचिव, श्री. स्वामी समर्थ फौंडेशन, मांडवगण फराटा, याच्या समवेत राझजिंग स्टार क्रिकेट क्लब, शिरूर यांचे सर्व सभासद डॉ. सुनिता यांच्या निवास्थानी उपस्थित राहुन सर्वांनी डॉ. सुनिता यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
close