shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळीचे वसंतराव मारकड यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड.

कौठळीचे वसंतराव मारकड यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या
 उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन  केले अभिनंदन .
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील कौठळी गावचे माजी सरपंच व युवा उद्योजक पै. वसंतराव मारकड यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी दिनांक २८ जून रोजी पुणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर ,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेशआप्पा थोरात ,इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, पिंपरी बुद्रुकचे माजी सरपंच  नानासाहेब नरूटे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस पदी निवड करून निवडीचे पत्र व सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सचिन खामगळ,  सोशल मीडिया प्रमुख हमा पाटील, बाळासाहेब गाढवे, हिरामण मारकड, जिगर मारकड ,दीपक मारकड व इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वसंतराव मारकड हे पैलवानकी करीत असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या वलयाने मित्रपरिवार जोडला तसेच गावातील नागरिकांमध्ये एक दिल्याने राहिल्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने संघटन केले. पुढे २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये ते ग्रामपंचायत सदस्य होते. या काळातील कार्यावरून ते पुन्हा २०१५ ते २०२० या कालावधीत कौठळी गावचे सरपंच पदी कार्यरत होते.
 तसेच राजकीय यशा बरोबर त्यांनी व्यवसाय क्षेत्रांमध्ये आपली महालक्ष्मी दूध संकलन केंद्र कौठळी याद्वारे युवा उद्योजक होण्याचा मान सन्मान मिळवला. अशा कार्यातून त्यांनी आपले सामाजिक व राजकीय वलय निर्माण केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीने गावातील व तालुक्यातील मारकड मित्रपरिवार यांच्याकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव  होत  आहे .
close