प्रतिनिधी : आसावरी वायकर
शिर्डी : (दि .३१) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले योगिराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७४ वा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते आज रोजी दुपारी २:३० वाजता करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले पाटील, आ.डाॅ.सुधीर तांबे, आ. लहुजी कानडे, आ. रमेश बोरनारे, माजी आ.कल्याणराव काळे आदिंसह विविध मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

