प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा : (दि.११) सामाजिक कार्यकर्ते गुरू गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेचे अध्यक्ष श्री .श्रेणिकशेठ खाटेर तसेच नगरसेविका सौ .संगिता श्रेणिकजी खाटेर यांच्या परिवाराच्या वतीने दि . १० जुलै रोजी करमाळा पोलिस स्टेशन पोलिस वसाहत येथे वृक्षारोपण करण्यासाठी विविध प्रकारचे 200 वृक्ष भेट देण्यात आले.
या वेळेस करमाळा पोलिस स्टेशनचे PI सुर्यकांत कोकणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी PI साहेब यांनी वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबुन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन केले .
तसेच वृक्ष लागवडीसाठी श्री खाटेर यांना 200 वृक्ष मिळावेत म्हणून विनंती केली असता त्यांनी ताबडतोब एक दिवसात वृक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलिस स्टेशनच्या वतीने खाटेर परिवाराचे आभार मान्यता आले . कोकणे साहेब यांनी वृक्षाचे किती महत्त्व आहे याबद्दल उपस्थितांना माहिती दिली .
श्री .खाटेर यांनी करमाळा पोलिस स्टेशन यांनी सेवेची संधी दिल्याबद्दल पोलिस स्टेशनला धन्यवाद दिले . तसेच PI कोकणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या .यावेळी गवारे साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .
सदर कार्यक्रमास PI कोकणे साहेब यांच्या सह पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ तसेच नगरसेविका सौ .संगिता खाटेर सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांच्या सह प्रदिपजी बलदोटा ,सौ .सोनाली बलदोटा, शंकर रासकर,सौ . हेमलता रासकर, तसेच PI कोकणे यांचा परिवार, कचरुलाल मंडलेचा,चरण परदेशी,सतिश बलदोटा, जितेंद्र लुणिया , दिनेश मुथ्था , आशिष बोरा , वैभव दोशी ,जमिलभाई काझी,अरूण टांगडे संग्राम देशमुख, अमोल परदेशी, नाना साहेब मोरे पत्रकार संजय शिंदे सचिन जवेरी ,विशाल सावंत, सौरभ शिंगाडे, आकाश दोशी अमित भास्कर, अजिंक्य महाजन, विकास लसकर, सोमनाथ कानगुडे विजय बरिदे, योगेश मुथ्था, गिरीष शहा, संघर्ष न्युज चे वाघमारे, वर्धमान खाटेर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .

