shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने तालुका स्तरीय उत्कृष्ट सहा ग्रामपंचायत व सहा लाभार्थी यांना आवास योजने अंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने तालुका स्तरीय उत्कृष्ट  सहा ग्रामपंचायत व सहा लाभार्थी यांना आवास योजने अंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भिगवन शेटफळगढे जिल्हा परिषद गट ठरली तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट क्लस्टर.



इंदापूर प्रतिनिधी: (३० जुलै २०२१)ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना यांच्या वतीने देण्यात येणारा महा आवास अभियान ग्रामीण तालुकास्तरीय पुरस्कार  २०२०-२१(अभियान कालावधी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१) पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने तालुका स्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक मदनवाडी ग्रामपंचायत, द्वितीय कळस ग्रामपंचायत, तृतीय वरकुटे खुर्द ग्रामपंचायत,
 तर तालुकास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत रमाई आवास योजना ,शबरी आदिवासी घरकुल , पारधी घरकुल योजना या अंतर्गत तालुका स्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांक भाटनिमगाव, द्वितीय बेलवाडी, आणि तृतीय निरगुडे या ग्रामपंचायतींना देण्यात आला.
तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुका स्तरीय उत्कृष्ट ला घरकुल लाभार्थी म्हणून प्रथम क्रमांक मयूर मधुकर खारतोडे कळस, द्वितीय आप्पा बाळू करे गोखळी, तृतीय श्रीमती जनाबाई बाबुराव शिर्के मदनवाडी.
 तर राज्य योजनेअंतर्गत तालुकास्तरीय उत्कृष्ट लाभार्थी प्रथम क्रमांक मुकेश आनंदराव भोसले भाटनिमगाव यांना शबरी घरकुल ,द्वितीय क्रमांक विशाल दादा खंडागळे निरगुडे रमाई आवास योजना, तृतीय क्रमांक संजय बाळू काळे शहा पारधी घरकुल योजना इत्यादी स्वरूपातील  तालुक्यातील सहा ग्रामपंचायत व सहा लाभार्थी यांना प्रशस्तीपत्रक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
 तसेच तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटाची निवड करण्यात आली यामध्ये शेटफळगढे या ठिकाणी दहा लाभार्थ्यांनी एकत्र येऊन रमाई कॉलनी ची उभारणी केली. तसेच इतर गावात हे चांगल्या पद्धतीने आवास योजना राबवण्यात आल्या त्यामुळे सदर जिल्हा परिषद गटाची तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून निवड करून सन्मानित करण्यात आले.

  प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सभापती स्वाती शेंडे व उपसभापती संजय देहाडे आणि गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते  सदर पुरस्कार वितरण पंचायत समिती अल्पबचत सभागृह येथे करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व  लाभार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांचे इंदापूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पंचायत समितीच्या पदाधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

तसेच सर्व मान्यवरांनी गट विकास  अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल विभागाचे कामकाज पाहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आले.

यावेळी  पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, प्रदीप जगदाळे,देवराज जाधव, प्रदीप काळे , सारिकाताई लोंढे, व तेजस जगताप व  सचिन धापटे विस्तार अधिकारी सांख्यिकी, गुणवरे लिपिक,हरी बंडगर लिपिक,
रणजित डोंगरे डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्ञानेश्वर घारे अर्थ विभाग,पूनम भोसले मनरेगा
तसेच इतर विभागाचे खाते प्रमुख  कर्मचारी उपस्थित  होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस जगताप यांनी केले.
close