शिर्डी शहर । प्रतिनिधी :
सन्मा, खासदार डॉ. सुजय दादा विखे पा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पथावर असलेल्या आणि महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या श्री.साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड शिर्डी च्या इतिहासात प्रथमच चेअरमन पदी महिला म्हणुन मा. सौ. श्रद्धाताई विजयराव कोते पा यांची आणि व्हा.चेअरमनपदी श्री दिनेश जी कानडे साहेब यांची बिन विरोध निवड झाली त्याबद्दल संस्थेच्या कामगारांच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय श्री आप्पासाहेब कोते पाटील यांचेही कामगारांनी अभिनंदन केले सदर कार्यक्रम प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन सौ. श्रद्धाताई कोते पा. यांनी संस्थेच्या कामगारांना मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले, कामगारांच्या वतीने श्री नवनाथ थोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर सत्कार समारंभ कार्यक्रमास संस्थेचे, श्री भगवान थोरात, नरेंद्र निकम, लक्ष्मण मोकळ, नितीन महाले, दिनकर साळवे, देविदास आसने, रावसाहेब वाणी, मंगेश कुलकर्णी, प्रकाश बनकर, पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

