*संजय शिंदे यांना कोरोना योध्दा पुरस्कार *
इंदापूर: कोरोना काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य गोरगरिबांच्या मदतीसाठी दिवस-राञ कष्ट घेऊन सेवा देणाऱ्या व्यक्तींना माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये शेटफळ हवेली (ता.इंदापूर) येथील तंटामुक्त समिती शेटफळ हवेलीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय (मामा)शिंदे कोविड यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अशी माहिती माळी सेवा संघ इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे यांनी दिली.
संजय शिंदे यांनी कोरोनाच्या काळात सामाजिक कार्यात सहभागी होऊन अनेक लोकांना मदत करण्याचे काम केले आहे.

