पुणे । प्रतिनिधी :-
कै. रामदासजी पवार यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे चालवत, कु.पार्वती विटकर, चंद्रकांत दरोडे प्रशालेमधून ई.१० वी मधे शिक्षण घेत असताना स्वतःचे नाव शाळेतून कमी करावे व दाखला मिळावा यासाठी सरांच्या कडे विचारणा करत होती, मला तिच्या कुटुंबाची परिस्थिती कळाली, तिच्या वडिलांना हाताला काम नाही व व्यसनाच्या आहारी गेलेले, आईचे छत्र हरपलेल, मग कु. पार्वती चा सांभाळ करणाऱ्या नातेवाइकांच्या सोबत चर्चा करुन तिच्यावर शाळेतून नाव कमी करण्याची वेळ येऊ नये व शिक्षणात खंड पडू नये.यासाठी मुकेश प्रतीष्ठान च्या माध्यमातून ई.१० वी ची फी रोख स्वरुपात देण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणुन पद्मश्री डॉ. धनराज पिल्ले सर यांच्या हस्ते कु.पार्वती हिस देण्यात आली .
या शाळेतील विद्यार्थी मित्रांना पिल्ले सरांनी ऑनलाइन वीडियो कॉन्फरेंस माध्यमातून मार्गदर्शन केले.मुकेश प्रतीष्ठान तर्फे पिल्ले सरांना नेल्सन मंडेला विद्यापीठ, साउथ आफ्रिका कडुन डॉक्टरेट ही पदवी बहाल केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
खडकीचे माजी उपाध्यक्ष मा. नगरसेवक श्री. मनीष जी आनंद यांनी पिल्ले सरांना शाळेत आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.
मुकेश प्रतिष्ठानचे संचालक महेंद्र पवार यांची बहिण कु. सायली ताई आगवणे हिच्या खडतर जीवनावर लिहिलेले पुस्तक श्री.धनराज पिल्ले सरांना भेट देण्यात आले, कु.सायली ताई ने काढलेली खास चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, तीने हाताने काढलेली चित्रे मुकेश प्रतीष्ठानच्या हितचिंतकाना भेट देण्यात आली.
यावेळी, गिरिश आप्पा गायकवाड, चेतन दादा पेठे, निलेश दादा घोडके, सौरभ देशपांडे सर, प्रकाश मामा जाधव, मुकेश पवार, लौकिक जाधव, पराग रावडे, संदीप मोरे, हे उपस्थित होते.
दरोडे शाळेच्या सर्व विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक मंडळी चे आभार मानण्यात आले..!
मी आहे खरी लाभार्थी
कु. पार्वती नरसिंघ विटकर रा. १००१ महालेनगर
आपला
महेंद्र सुमन रामदास पवार
अध्यक्ष
( मुकेश प्रतिष्ठान )

