प्रतिनिधी । मोहन शेगर:
सोनई--औरंगाबाद येथील हिंदुस्थान आवासा पैठणरोड वरील नक्षत्र वाडीतील विवाहितेला माहेरून दीड लाख रुपये आण, नाहीतर सासरी येऊ नको,या मागणीसाठी मानसिक,शारीरिक, मारहाण,शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवत असल्याप्रकरणी पती,सासू,दिर,सासरा,मामे सासरे,या सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,माझे लग्न १० मे १९ रोजी कुंकवाच्या कार्यक्रमात हिंदू धर्म रीतिरिवाज प्रमाणे मानपान देऊन खरवंडी रोड ( सोनई .ता. नेवासा)लगत राहणाऱ्या घरी विवाह झाला होता. तुम्ही केलेल्या गेटकिंन लग्नामधील तुझा मोठा खर्च वाचला असून इलेक्ट्रॉनिक दुकान टाकण्यासाठी तू माहेरून तुझ्या आई वडिलांकडून दीड लाख रुपये आण या मागणीसाठी माझा शारीरिक, मानसिक, मारहाण, वाईट शिवीगाळ, उपाशी पोटी ठेवल्या प्रकरणी पती रोहित हरिदास चांगुलपाई,सासू अलका हरिदास चांगुलपाई, सासरे हरिदास पांडुरंग चांगुलपाई, दिर रंजित हरिदास चांगुलपाई, दिर ऋषिकेश हरिदास चांगुलपाई, सर्व रा.हिंदुस्तान आवासा पैठण रोड, नक्षत्रवाडी, औरंगाबाद, तसेच मामे सासरे विजय विष्णू बंड ,भरत विष्णू बंड, रा.धनगरवाडी ता.नेवासा यांचे विरुद्ध विवाहितेने केलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली नुसार वरील लोकां विरोधात २३१/२०२१ नुसार ४९८-अ,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास स.पो नि. रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ हनुमंत गर्जे करत आहे .

