*माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने विविध मान्यवरांचे सन्मान*
इंदापूर:माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने (४ जुलै) इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती देवराज (भाऊ) जाधव यांची इंदापूर सहकारी अर्बन बँकेच्या चेअरमन् पदी निवड झाल्याबद्दल तसेच ग्रामपंचायत निमगाव केतकीचे विद्यमान सदस्य पैलवान सचिन जाधव यांची ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने सत्कार व् सन्मान सोहळा आयोजित केला होता, तसेंच चि. अक्षय माळी यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष निवड झाली म्हणून आदरणीय यावेळी देवराज जाधव यांनी त्यांचा गावाच्या वतीने सत्कार केला. देवराज (भाऊ) जाधव हे माळी सेवा संघाच्या महिला तालुका अध्यक्षा वर्षाताई भोंग यांचे सख्ये चुलते आहेत व सचिन जाधव हे त्यांचे जेष्ठ बंधू आहेत.
या सोहळ्यास माळी सेवा संघ महाराष्ट्रराज्य कायदेशीर सल्लागार नितीन राजगुरू,इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, महिला तालुका अध्यक्षा, वर्षा ताई भोंग ,तालुका कार्यकारिणी सदस्य व इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चि..अक्षय माळी . बाळासाहेब झगडे माजी उपसरपंच झगडेवाडी व अध्यक्ष महात्मा फुले ग्रुप अध्यक्ष संदीप बारवकर शिक्षक व तालुका सचिव दादा शिंदे तालुका संघटक, ॲड. सुभाष भोंग ग्राम पंचायत सदस्य निमगाव केतकी,निमगाव केतकीचे माजी ग्रा. पं. सदस्य माणिक (आबा)भोंग,सुनिल भोंग,पिंटूभोंग,संदिप ननावरे,गणेश भोंग,समीर भोंग,चैतन भोंग, आदी मान्यवर उपस्थित होते.

