shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड परिसरातील 'त्या' व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा..!!



पुणे:-पुण्यातील कात्रज घाटात शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवड परिसरातील आनंद गुजर या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा खून झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यामुळे पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले.

आनंद गुलाब गुजर (43, रा. चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद यांचा भाऊ सुनिल गुलाब गुजर (36) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयताची पत्नी सरोज आनंद गुजर (40, रा. चिखली), रमेश विलास कुंभार (49, रा, आकुर्डी, पुणे) यश योगेश निकम (19, रा. वाल्हेकरवाडी, निगडी) आणि रामदास बडदम (रा. वाल्हेकरवाडी, निगडी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता आनंद गुजर यांची पत्नी सरोज गुजर आणि रमेश विलास कुमार याचे अनेतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी हा खून केल्याचे सांगितले.
आरोपींनी वाल्हेकरवाडी येथील शिवगोरक्षनाथ मठामध्ये आनंद गुजर यांना लाकडी बॅट व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर एका चारचाकी वाहनात मृतदेह टाकून कात्रज घाट परिसरात टाकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. अवघ्या बारा तासात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक संगिता यादव, पोेलिस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, सचिन गाडे, जगदीश खेडकर, प्रसाद टापरे आणि संतोष खताळ यांच्या पथकाने केली आहे.
close