अहमदनगर प्रतिनिधी :
(दि.१४) जुलै २०२१:- अहमदनगर जिल्ह्यात अनेक हादरून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या महामारीच्या संकटातही अनेक गुन्हेगारी घटना घडल्याचे समोर आले.
अहमदनगर जिल्हा तर अनेक अशा घटनांनी हादरून गेला आहे. आता आणखी एक धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. खुन गोळी बार अशा अनेक घटना अहमदनगर पोलिस दलाने बर्याच गुन्हे उघडकीस आणुन आरोपीना अटक केले आहे.
प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री खंडाळ गावाच्या शिवारात नगर- दौडवरील हॉटेल राजयोगमध्ये ही कारवाई केली.
याठिकाणावरून तीन परप्रांतीय मुलींची सुटका केली. तर कुंटणखाना चालविणाऱ्या बाप-लेकांना अटक करण्यात आली आहे.
अनिल माणिकराव कर्डीले (वय 52) व अक्षय अनिल कर्डीले (वय 25 दोघे रा. खंडाळा ता.नगर) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. खंडाळ गावाच्या शिवारात हॉटेल राजयोगमध्ये परप्रांतीय मुलींना देहविक्री करण्यासाठी बोलावून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती.
त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक सानप यांच्या पथकाने छापा टाकला असता .
या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळवून आल्या. त्याना अहमदनगर येथील स्नेहालय संस्था येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हाॅटेल मालक व मुलगा याना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

