राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात २५/१५ अंतर्गत १० कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर..
इंदापूर:राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात २५/१५ अंतर्गत १० कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर झाल्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी सांगितले.
प्रसिद्धी माध्यमांसाठी दिलेल्या निवेदनात तालुका अध्यक्ष कोकाटे व कार्याध्यक्ष झगडे यांनी सांगितले आहे की राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झालेला आहे.यामध्ये प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर सर्वसामान्य माणसाला विविध विकास कामाचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास निधी इंदापुर तालुक्यातील गावांमध्ये सर्वसमावेशक वाटप करण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यातील रस्ते पक्के होऊन जोडले जाणार आहेत त्यामुळे दळणवळणाची क्रिया जलद होईल तसेच गावांमध्ये हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत.मंदिरांसमोर सभामंडप बंधारे तसेच विविध विकास कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
यापुढील काळातही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये विकास कामे केली जातील असे मत तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी व्यक्त केले.
निधी मंजूर झालेले गावे पुढील प्रमाणे:
बेलवाडी (३१ लाख )पिंपरी बुद्रुक (३० लाख) हिंगणगाव( २५ लाख )निमगाव केतकी (६० लाख) घोलपवाडी (५लाख )सराफवाडी (१५ लाख) पिटकेश्वर (५ लाख) चाकाटी (८ लाख) गिरवी (५ लाख )गोंदी (१३ लाख) कळंब ( ३५ लाख) डाळज (५ लाख )पिठेवाडी (५ लाख) न्हावी (६ लाख) निंबोडी( ५२ लाख )गलांडवाडी न.( ५ लाख )कचरवाडी (२० लाख )शेटफळगडे (२५ लाख )भांडगाव (१२ लाख )लोणी देवकर (२५ लाख) अगोती (५ लाख) थोरातवाडी (३ लाख) निमसाखर (२३ लाख )सराटी (२३) बावडा( ३ लाख) बाभूळगाव( ८ लाख ) लाकडी ( ७० लाख) आनंद नगर (३ लाख )पळसदेव( ५ लाख )डिकसळ (२० लाख )शिरसोडी (७ लाख )काटी (४० लाख) रेडा (५ लाख) गोखळी( १५ लाख) रणगाव (२० लाख) दगडवाडी( २० लाख) निर निमगाव (१० लाख) कुरवली (१० लाख) सुरवड (१८ लाख) गोतंडी (१५ लाख) वडापुरी( ५५ लाख )भरणेवाडी (७५ लाख ) अंथूर्णे( ९८ लाख) तरंगवाडी (३३ लाख ) झगडेवाडी (५ लाख) बोरी (४५ लाख)जंक्शन (१५ लाख)

