shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसाद शुगर कारखान्याचा हंगाम २०२१-२२ रोलर पूजन समारंभ संपन्न..!!

राहुरी: आज गुरुवार दिनांक ०८/०७/२०२१ रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर अँण्ड अँलाईड अँग्रो प्रोडूक्टस लिमिटेड वांबोरी या कारखाण्याचा हंगाम २०२१-२०२२ करिता मिल रोलरपूजन समारंभ कारखाण्याचे जेष्ठ संचालक मा.सुरेशशेठ्जी बाफना यांच्या शुभहस्ते दुपारी-११.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 

      


प्रसाद शुगर अँण्ड अँलाईड अँग्रो प्रोडूक्टस लिमिटेड .वांबोरी चे कार्यकारी संचालक मा. सुशीलकुमारजी देशमुख साहेब यांनी सांगितले कि मागील हंगाम सन २०२०-२०२१ चे ऊस उत्पादक, उस तोडणी-वाहतूकदार यांची एफआरपी सह संपूर्ण ऊस बिल देणी व तोडणी-वाहतूक देणी वेळेत अदा केली आहेत त्यामुळे उत्पादक,आणि तोडणी-वाहतूकदार यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण असून  गळीत हंगाम २१-२२ साठी शेतकऱ्यांचा ऊस वेळेत ऊसतोड होण्याच्या दृष्टीने सक्षम तोडणी-वाहतुक यंत्रणा करार द्वारे पूर्ण भरती केलेली आहे. 

   


तसेच चालू हंगाम २०२१-२०२२ सुरु करण्याच्या अनुषंगाने मशिनरी रीपेअरिंग,ओवर ऑईलींग, जलद गतीने सुरु असून ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. या गाळप हंगामात ०८ लाख में.टन ऊस गाळपाचे उदिष्ट् ठरवलेले असून कारखाना दैनंदिन गाळप क्षमता ५००० में.टन गाळप करण्यास सज्ज आहे तसेच ३० केएलपीडी क्षमतेचा आसवानी प्रकल्पाचेकाम अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबर-२०२१ मध्ये प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक मा.सुशीलकुमारजी देशमुख साहेब यांनी सांगितले आहे.

   

“कारखाण्याचे जेष्ठ संचालक मा. सुरेशशेठ्जी बाफना म्हणाले की या गळीत हंगामात कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री नामदार प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक मा.सुशीलकुमारजी देशमुख साहेब यांच्या काटेकोर नियोजनातून उच्चांकी ०८ लाख में. टन पेक्षा जास्त गाळप करण्याचे उदिष्ट् ठेवलेले आहे.”

या कार्यक्रम प्रसंगी कारखाण्याचे चीफ जनरल मॅनेजर श्री.आभाळे व्ही.आर. साहेब, वर्क्स मॅनेजर श्री.म्हस्के एस.ए. जनरल.मॅनेजर(प्रोसेस) श्री.माने साहेब, लेखाविभागाचे श्री.सूर्यवंशी,फुगारे साहेब शेतकी अधिकारी श्री.घुगरकर, मा.काकडे साहेब पर्चेस विभागाचे श्री.पाटील,दळवी साहेब, सुरक्षा श्री.वाघमारे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे श्री.पाटिल साहेब आणि सर्व खातेप्रमुख,कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

दिपक हरिश्चंद्रे ( राहुरी ता.प्रतिनिधी)

close