shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पावसाळ्यात जीव मुठीत धरून वाहन चालवतात निर्मलनगरचे रहिवासी..!!

लोक प्रतिनिधींनो आतातरी जागे व्हा..


प्रतिनिधी : आसावरी  वायकर

अ . नगर : ( दि . ८ ) : नगर येथील प्रभाग क्र . २ येथील निर्मलनगर या उपनगरात प्रवेश करणारा मुख्य रस्ता खड्ड्यांमुळे धोकेदायक बनला आहे .



प्रभाग क्र. २ निर्मलनगर येथे प्रवेश करताना मुख्य रस्त्याला सुरुवातीलाच एक छोटा पूल आहे .त्याच्या शेजारीच हनुमान मंदिर असून मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत . रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हा तसा नगरकरांसाठी संशोधनाचा विषय आहे .

 


पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते . परिणामी दुचाकी वाहन धारकांना गाडी चालविताना तसेच नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. या खड्ड्यांमुळे येथे अपघातही झालेले आहेत . येथील रस्त्यांवरील साचलेले पाणी जाण्यासाठी कोणतीही सोय केलेली दिसून येत नाही .


या प्रभाग क्र . २ मधील लोकप्रतिनिधींनी व महानगर पालिकेने खड्डे लवकरात लवकर बुजवावेत . जेणेकरून कोणाला अपघात होणार नाही अशी नागरिकांमधून मागणी होत आहे .

close