shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण..!!

आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा सुखावला, कोवळ्या पिकाला मिळाले जिवदान..!! 

====================     

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 

गेल्या दहा ते पंधरा  दिवसापासून केज तालुक्यात दडी मारलेल्या पावसाने हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुन्हा आगमन केले  असुन आज तालुक्यात जवळपास सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

      


मृग नक्षत्रात एकाच मोठ्या पावसावर केज तालुक्यातील बळीराजाने घाईघाईने खरीपाची पेरणी केली होती. मात्र नंतरच्या काही दिवसात कुठे कुठे भुरभुर पावसाने कोवळी पिके ऊगवुन चांगली आली.परंतु पाऊस काही आला नाही. चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून पावसाची अतुरतेने वाट पहात बसलेला शेतकरी  पाऊस कधी येणार या चिंतेने शेतकरी चिंतातुर झाला होता. 

सध्या अंगाची लाही लाही करणारे तप्त ऊन आणि या मुळे जमिनिच्या वर येणारे कोवळी पिके सुकुन जावु लागल्याने  दुबार पेरणीचे संकट येते की काय ? अशी चिंता शेतकरी वर्गात सतावत असतानाच गेल्या दोन ते तिन दिवसापूर्वी पासून हवामान विभागाच्या वतिने  दि ८ जुलै पासून महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या बातम्यातुन प्रसिध्दी माध्यामाद्वारे सांगतल्याने  सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

तोच हवामान खात्याचा अदांज खरा ठरला.आणि दि.८ जुलै रोजी सांयकाळी ५:००वा. केज तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. सुरुवात होताच शेतकरी वर्गात चैतन्य फुलले चिंतेतील बळीराजा आनंदीत झाला. काल झालेला पाऊस मोठा नसला तरी सध्याच्या पिकासाठी पोषक व जिवदान ठरला आहे. गुरूवारी झालेल्या पावसाने लहान लहान नाले ओढे वाहु लागले आहेत. सांयकाळी ५:०० वाजता आलेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

close