shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रिमझिम पावसामुळे खरीपातील पिकांना संजीवनी..!!

नगर प्रतिनिधी :-(शिवा म्हस्के) गत दोन दिवसांपासून गुंडेगाव परीसरात  रिमझिम स्वरूपात संततधार पाऊस सुरू असून यामुळे पाण्याअभावी तसेच किडींचा प्रादुर्भाव होऊन संकटात सापडलेल्या खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे; मात्र मध्यंतरी पावसाची प्रदिर्घ उघडिप आणि आता सुरू असलेला पाऊस दमदार स्वरूपात नसल्याने सिंचन विहिरीना  पाणी पातळीत कुठलीही वाढ झालेली नाही. गुंडेगावचे  भौगोलिक क्षेत्र ४ हजार १४६ हेक्टर आसून वहीतीखाली  २हजार८२६  श्रेत्रापैकी २८ टक्के  खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे . यंदा मात्र पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही विलंबाने सुरू झाल्या. परिणामी, सोयाबिनचा अपवाद वगळता उडिद, मुग या कडधान्य पिकांसह अन्य पिकांचे क्षेत्र घटले आहे.  




दरम्यान, आधी विलंब आणि मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबिनचे पीक धोक्यात सापडले होते. पाण्याचा अभाव आणि अधूनमधून निर्माण होणाºया ढगाळी वातावरणामुळे या पिकावर हिरवी उंटअळी, खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.अशात गत दोन दिवसांपासून रिमझिम तथा सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस होत असल्याने पिके धुऊन निघाली असून किडींचा प्रादुर्भाव बºयापैकी घटल्याने गुंडेगाव परिसरातील  शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

        

यंदा मान्सूनच्या पावसानं वेळेआधीच एन्ट्री घेतली. जून महिन्यात पहिल्या पंधरावड्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यात जवळपास   पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, नंतरच्या काळात पावसात खंड पडल्यानं गुंडेगाव येथे  ठिकठिकाणी पिकं उन्हामुळं माना टाकू लागली होती. तर, शेतकरी मिळेल त्या मार्गानं पिक जगवण्याचा प्रयत्न करत होता कारण गुंडेगावाची भौगोलिक परिस्थिती पाहता फक्त विहर सिंचनाखाली ९१० हेक्टर श्रेत्र आहे तर बाकी सर्व श्रेत्र पावसावर आवलंबून आहे . 

पावसानं कमबॅक केलं आहे. मात्र, एवढ्या पावसावर पिकं वाचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.  अंदाजानुसार चार दिवस पाऊस झाला तर गुंडेगाव परिसरातील  पिकांना पुन्हा एकदा उभारी मिळू शकते.

close