किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा...
प्रतिनिधी :संजय वायकर
अ .नगर (दि .६ ) : नगर शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे, त्याचबरोबर डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मनपावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आसूड मोर्चा काढत मनपाला जाब विचारण्यात आला आहे.
शहरातील खड्ड्यांच्या तसेच रस्त्यांची प्रलंबित कामे करण्याच्या मागणी संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य आसूड मोर्चा महानगरपालिकेवर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी किरण काळे यांनी स्वतः महापालिकेवर जनसामान्यांच्या प्रश्नावर आसूड उगारला. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी काँग्रेस आंदोलकांनी महानगरपालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोतराजांसह किरण काळे यांनी मनपावर आसूड उगारत मोर्चाचे नेतृत्व केले. टॉप अप पेट्रोल पंपापासून सुरू झालेला मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. त्यावेळी महानगरपालिकेचा आवार आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेला होता. आंदोलकांच्या हातांमध्ये महानगरपालिकेच्या निषेधाचे फलक झळकत होते. काँग्रेसचे झेंडे देखील फडकत होते.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना किरण काळे म्हणाले की, महानगरपालिकेने गाढ झोपेचे सोंग घेतले आहे. मनपातील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी दररोज शहरातील रस्त्यांवरून जा-ये करत असतात. त्यांना रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत का ? नागरिकांकडून कर संकलन करण्यासाठी मनपाकडून दारामध्ये वाजंत्री पाठविली जाते. आता नागरिकांच्या खड्डेमुक्त शहराच्या हक्कासाठी आम्ही पोतराज आणि वाजंत्री घेऊन महापालिकेच्या दारात महापालिकेला झोपेतून उठविण्यासाठी आलो आहोत.
यावेळी काळे यांनी मनपा सत्ताधाऱ्यांची नावे न घेता सडकून टीका केली. भाजप, राष्ट्रवादीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात मध्ये नगर शहराची वाट लागली. शहराचे आणि महानगरपालिकेचे नेतृत्व करणारे आमदार हे विकासाचे व्हिजन नसलेले असल्यामुळेच शहराची ही दुरावस्था झाल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला.
नगर शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत. अनेक कामे प्रलंबित आहेत त्याचबरोबर डीपी रस्त्यांचा प्रकल्प देखील बासनात गुंडाळून पडला आहे. ही सर्व कामे मनपाने तातडीने हाती घेत त्या दृष्टीने पावले उचलावीत. अन्यथा नगरकरांच्या संयमाचा उद्रेक होईल असा इशारा यावेळी काळे यांनी दिला. काळे यांनी यावेळी आरोप केला आहे की शहरातील ठराविक ठिकाणी वारंवार खड्डे पडतात आणि ते खड्डे वारंवार बुजवले जातात. असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना महानगरपालिका काळ्या यादीत का टाकत नाही ? का संगनमताने महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे ? असा सवाल यावेळी काळे यांनी उपस्थित केला.
मनपाचे आयुक्त शंकर गोरे यांनी काँग्रेसची निवेदन बाहेर येऊन स्वीकारले. काँग्रेसचे तीन एकर आलेला मागण्यांवर ती लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. एवढी ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज मुंडेच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद आदींची भाषणे झाली. शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद यांनी मोर्चाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, एससी विभागाचे नाथा अल्हाट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, विद्यार्थी नगर तालुकाध्यक्ष सुजित जगताप, सचिव प्रशांत वाघ, सागरदादा काळे, माजी नगरसेविका जरीना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शारदा वाघमारे, नलिनी गायकवाड, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, सेवादल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, लखन छजलानी, रावसाहेब काळे, दीपक चांदणे, साईनाथ बोराटे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने, आसाराम पालवे, राहुल गांधी विचार मंचचे सागर ईरमल, सचिव ॲड. सुरेश सोरटे, सहसचिव शंकर आव्हाड, सिद्धार्थ झेंडे, अविनाश धनगर, राणी पंडित, शबाना बागवान, रिजवाना शेख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख, इम्रान बागवान, अजय मिसाळ, विशाल घोलप, अक्षय पाचरणे आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
--------------------------------------
आसूड मोर्चाच्या निमित्ताने मनपामध्ये काँग्रेसच्या वतीने मोठी गर्दी करण्यात आली होती. या निमित्ताने काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. अनेक वर्षांनंतर काँग्रेसच्या वतीने असे भव्य आंदोलन नगर मध्ये झाले आहे. भानुदास कोतकर शहर जिल्हाध्यक्ष राहिल्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेस मध्ये मरगळ आल्याचे दिसत होते. मात्र किरण काळे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सोपविल्यानंतर काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शहरामध्ये मरगळ झटकत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे.
__________________________________
उपायुक्त यशवंता डांगे यांनी बाहेरून आंदोलकांची निवेदन स्वीकारले. उपायुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र आयुक्त स्वतः बाहेर न आल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आयुक्तांचा निषेध केला.
___________________________________
पोलीस उपनिरीक्षक सोळंके यांनी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना विनाकारण काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसी सभ्यतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून गुंदेचा यांनी केला आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस महासंचालक यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

