shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगाव तालुक्यातील उटी(ब्र )येथील देशी दारूचे दुकाने बंद करा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आक्रमक..!!

सेनगाव। प्रतिनिधी:
दि.६,हिंगोली जिल्हयातील सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथे मागील कित्येक वर्षापासून देशी दारूची अवैध विक्री सुरू आहे. 


देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्यामुळे उटी ब्रह्मचारी येथील बरेच कुटुंब उघड्यावर आलेले आहेत तर बरेच कुटुंब उध्वस्त देखील झालेले आहेत तर बऱ्याच महिलांना या देशी दारूचा त्रास सहन करावा लागतोय त्या अनुषंगाने आज दि.६ जुलै मंगळवार रोजी सेनगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने सेनगाव चे तहसीलदार शिवकुमार कांबळे व सेनगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. 

तसेच येत्या दोन दिवसांमध्ये उटी ब्रह्मचारी येथील देशी दारूची दुकाने बंद करावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने सेनगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण केले जाईल असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ वैशाली वाघ, सेनगाव पंचायत समितीच्या उपसभापती अरुणाताई गडदे, कुंताताई ढवळे, पार्वतीताई बोचरे, अर्चनाताई ढवळे, रेखाबाई सरपते आदीसह सेनगाव तालुक्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने निवेदन देत असताना उपस्थित होत्या.
close