हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.५,हिंगोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अ.भा.भ्रष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीचे हिंगोली जिल्हा सचिव सचिन रामचंद्र दराडे यांची समितीच्या मराठवाडा विभागीय संघटक पदी नुकतीच निवड झाल्याने दि.४ जुलै रविवार रोजी धर्माबाद येथील महाविर भवन मध्ये कोरोना योध्दा सत्कार कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील बाबा खंडापुरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सचिन दराडे यांचा सत्कार करण्यात आला.
यापुर्वी सचिन दराडे यांनी समितीच्या हिंगोली जिल्हा सचिव पदावर असतांना कोरोना काळात गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या आईच्या स्मृती पित्यार्थ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व नातेवाईकांना तसेच गरीबांना मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली.तसेच अनेक सामाजिक कार्य करीत आहेत.या कार्याची दखल घेत मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके यांनी दराडे यांची समितीच्या मराठवाडा संघटक पदी निवड करावी यासाठी राष्ट्रीय निवड समितीकडे एक पत्र पाठविले होते.या पत्राची दखल घेत निवड समितीने सचिन दराडे यांची मराठवाडा संघटक पदी निवड केली.दि.४ जुलै रविवार रोजी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील महाविर भवनमध्ये समितीच्या वतीने कोरोना योध्दा सत्काराच्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील बाबा खंडापुरकर यांच्या हस्ते सचिन दराडे यांना नियुक्तीपत्र पत्र देऊन कोरोना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्षा राणीताई स्वामी,प्रदेश हुमन राईट युवती पुजाताई निचळे,प्रदेश उपाध्यक्ष अमरसिंग काँलरा,प्रदेश कार्याध्यक्ष रामगिरी पाटील,प्रदेश सेक्रेटरी राजु पाटील सिंपाळकर,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षा लक्ष्मीताई,नांदेड जिल्हा संघटक शंकर मावलगे,आयटी सेल प्रदेशाध्यक्ष संतोष ठाकरे,मराठवाडा अध्यक्ष विजयालक्षमी,मराठवाडा कार्याध्यक्ष योगिताताई,नांदेड अध्यक्षा आशाताई पांचाळ,यामावार मैडम,छोटु पाटील बाबळीकर तसेच हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे,हिंगोली जिल्हाध्यक्ष किसान विभाग शंकरराव देशमुख,हिंगोली महिला कोषाध्यक्ष आशाताई घोडके,हिंगोली तालुकाध्यक्ष वसंतराव जोगदंड,सेनगाव तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे,सेनगाव तालुका महिला अध्यक्षा वंदनाताई थिट्टे,प्रसिध्दीप्रमुख पत्रकार विश्वनाथ देशमुख तसेच समितीचे नांदेड,हिंगोली जिल्हयातील पदाधिकारी,महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी सचिन दराडे यांचे निवडी बद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

