शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश.. वनगळी पाझर तलाव सांडव्याचे अतिक्रमण काढण्यास दिले प्रशासनाने आदेश.
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील वंगळी येथील स्थानिक शेतकरी आणि रहिवासी यांच्या मालमत्तेला व जीविताला धोकादायक ठरत असलेल्या पाझर तलावाच्या सांडवावरील अतिक्रमण हटवण्यास शेतकरी संघटनांच्या प्रयत्नांना अखेर यश आले . गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या हा प्रश्न आता लवकरच सुटणार असल्याचे दिसत आहे. अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गुलाब फलफले ३० जुलै शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी यांनी इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला होता.
या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या आदेशान्वये उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपविभाग लघुपाटबंधारे इंदापूर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तींना पुढील दोन दिवसात स्वखर्चाने अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. पंधरा दिवसात अतिक्रमण न हटवल्यास प्रशासकीय यंत्रणेमार्फत अतिक्रमण हटविण्यात येईल व सदर कारवाईचा खर्च अतिक्रमण करणाऱ्यांच्या सातबारा वरती चढवला जाईल असे आदेश अतिक्रमण करणाऱ्यांना देण्यात आले .
या आदेशानंतर शेतकरी संघटनेने उपोषण मागे घेतले असले तरी कारवाई न झाल्यास शेतकरी संघटना स्वतः अतिक्रमण हटविले असा इशाराही प्रशासनाला दिला आहे. पाटबंधारे विभागाने वंगळी तालुका इंदापूर येथे गट क्रमांक ४३ बांधलेल्या पाझर तलावाच्या सांडव्याच्या क्षेत्रातील टेल चैनल मध्ये काही व्यक्तींनी पत्र्याच्या शेडच्या खोल्या ५०४० चे शेड सर्विससेंटर आणि दुकान असे अतिक्रमण करून सांडवा पूर्णपणे बुजवला होता. ज्याचा फटका ्थानिक शेतकर्यांच्या पिकांना आणि घरांना बसत होता .तर भविष्यात अतिवृष्टी झाल्यास सांडवा फुटून स्थानीक शेतकऱ्याच्या मालमत्तेसह जीवालाही मोठा धोका होण्याची शक्यता शेतकरी संघटनेने वर्तवली होती.
याबाबत शेतकरी संघटना गेल्या चार वर्षापासून पाटबंधारे विभागासह वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाकडे पत्रव्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटून कारवाईची मागणी करत होती. मात्र कारवाई होत नसल्याने शेतकरी संघटनेने काल उपोषण करून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
जर कारवाई करण्यास दिरंगाई केली तर शेतकरी संघटना स्वतःहून जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटविले या वेळी होणार्या परिणामास संबंधित प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील असे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाब फलफले यांनी सांगितले.

