सोनेरी दिवस ...... श्री स्वामी समर्थ 🙏
मराठी हृदयसम्राट आदरणीय "राजसाहेब ठाकरे" यांची सदिच्छा भेट घेऊन माझे आजोबा बालगंधर्वकालीन
नेपथ्यकार "स्व. पेंटर बाबुराव श्रीगोंदेकर" यांनी रेखाटलेले १९७२ सालचे गणपती बाप्पाचे चित्र देऊन राजसाहेबांचा सत्कार केला. आणि सोबतच "ठाकरे कुटुंबियांशी श्रीगोंदेकर कुटुंबियांचे" असलेल्या जुन्या संबंधांना उजाळा मिळाला ..!
१९६७ साली साधारण डिसेंबर महिन्यात हिंदुहृदयसम्राट "स्व. बाळासाहेब ठाकरे" यांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार माझ्या तोफखान्यातील राहत्या घरी माझ्या आजोबांची सदिच्छा भेट घेतली होती .. भेटीचे कारण होते "छत्रपती शिवाजी महाराजांचे" चित्र माझ्या आजोबांकडून काढून घेणे... त्याप्रमाणे स्व. बाळासाहेबांनी ,आजोबाना ते चित्र काढण्यास सांगितले आणि १९६८ साली जानेवारी महिन्यातील संक्रांतीच्या दिवशी ते "छत्रपती शिवाजी महाराजांचे" चित्र घेऊन माझे आजोबा "स्व. पेंटर बाबुराव श्रीगोंदेकर" , माझे गुरुवर्य वडील "श्री. सुभाष श्रीगोंदेकर" हे मुंबई येथील स्व. बाळासाहेबांच्या , "मातोश्री" निवासस्थानी गेले आणि त्यावेळेला "स्व. श्रीकांतजी ठाकरे" आणि "स्व.प्रबोधनकरजी ठाकरे" हे देखील उपस्थित होते .... संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी आजोबानी काढलेल्या "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" चित्राचे मनःपूर्वक "कौतुक" केले .. ह्या तब्बल "५३ वर्षांपूर्वीच्या मैत्री" संबंधांना उजाळा मराठी हृदयसम्राट आदरणीय "राजसाहेबांना" भेटून दिला ....
सोबतच माझ्या आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपट "पन्हाळा" ह्यासाठी साहेबांचे आशिर्वाद घेतले ... चित्रपटाचे पोस्टर साहेबांना दाखवले. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र ह्या चित्रपटावर प्रेम करणार ह्यात बिलकुल शंका नाही ...राजेसाहेबांना भेटताना "पन्हाळा" ह्या चित्रपटाचे 'लेखक आणि दिग्दर्शक', "मिथलेश" सुद्धा उपस्थित होते ..
कलाकारांची सर्वस्वी जाण ठेवणारे "आदरणीय राजसाहेबांना" भेटल्यावर साक्षात "परमेश्वर" समोर उभा आहे असे वाटले ....हा "सोनेरी दिवस" मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही ...
जय शिवराय जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
जय हिंद .....🙏
Special Thanks
Mr. Sainath Babar 🚩🚩
Mr. Suryakantji Kadam🚩🚩
Mr. Ganesh Bhau Bahalaskar 🚩🚩
&
माझा लहान भाऊ आणि लाडका मित्र ,
Mr. Navnath Butte..... 🚩🚩

