shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महामार्ग चौपदरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या मुरुमाच्या खदानीवर धाड ; धडक कारवाई सहा वाहने जप्त...!!




प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
९९६०५९५८०७

एरंडोल-अँग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्या तर्फे एरंडोल लगतच्या राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून या कामासाठी लागणारा मुरुम व दगड एरंडोल उत्राण रस्त्या लगत असलेल्या त्यांच्या मालकीच्या खदानीवरुन नेला जातो. उपायुक्त कार्यालय नाशिकच्या पथकाने गुरुवारी दूपारी सदर खदानीवर धाड टाकली व तपासणी केली. या वेळी प्रभारी तहसीलदार एस.पी.शिरसाठ यांना पाचारण करण्यात आले.
या वेळी काही वाहने ओव्हर बर्डन आढळून आली. मुरुम व दगड भरलेल्या दोन वाहनांसह चार रिकामी वाहने जप्त करण्यात आली. सदर वाहने एरंडोल पो. स्टे. ला जमा करण्यात आली आहेत. तसेच गौणखनीज वाहतूकी संबधी आवश्यक असलेले परवाने परमीट व चलन तपासणी वेळी सादर करण्यात आले नाही. पथकातील चार अधिकारी व प्रभारी तहसीलदार एस.पी.शिरसाठ यांनी कारवाई केली.
जप्त करण्यात आलेली वाहने पुढील प्रमाणे मुरुम भरलेले ट्रेक टर कमांक एम.एच.१९ बीजी ६५६७, दगड भरलेला टाटा ट्रक एम एच १८ बीजी ११३०, रिकामी वाहने ट्रेकटर कमांक. MH 19 C Y 5534, JCB क्र. MH 19 BG 3691, टाटा ट्रक क्र. MH 19 C Y 5573, टाटा ट्रक क्र. MH 18 BG 1205
दरम्यान अवैध रीत्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्याची इंडिकेटर लागले आहे. 30 जूलै अखेर परवाने परमिट चलन वाहतूक पासेस संबंधित ठेकेदाराला तहसील कार्यालयात सादर करावी लागणार आहेत. अन्यथा दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

close