प्रतिनिधी : संजय वायकर
जळगाव : (दि .३०) :अभिषेक पाटील फाऊंडेशन ,जळगाव यांच्या वतीने जळगाव शहरातील शाहूनगरमधे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवण्यात आली.त्या निमित्ताने स्थानिक नागरिकांकडून आधारकार्ड व रेशनकार्ड च्या आधारे ऑनलाइन नोंदणी मोफत केली.त्याची नोंदणी सरकारी होऊन नागरिकांना आयुष्यमान कार्ड मिळेल.ते प्राप्त झाल्यानंतर संबंधित नागरिकांना वाटप करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे आज शाहूनगरमधे खाजगी हॉलमधे ११ वाजता उदघाटन झाले.त्यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील,त्यांच्या मातोश्री ,पंकज बोरोले,स्वप्निल नेमाडे ,जयश्री पाटील व राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पक्षाबाहेरील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, ईश्वर मोरे यांनी उपस्थिती दाखवली.
घरकुल योजना, शौचालय अनुदान,रेशनकार्ड,आयुष्यमान कार्ड अशा योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. शहरातील ५० लोकांना त्याची नोंदणी करण्याचे ज्ञान नाही. वरून ऑनलाइन चे भूत मानेवर.त्यामुळे योजनेचा लाभ तर दूरच पण साधे नोंदणी करता येत नाही. म्हणून पात्र नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहातो.आणि भलतेच चलाख ,श्रीमंत लोक गैरफायदा घेऊन तर्र होतात.
जसे पीक अर्ज धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांऐवजी मुंबईतील फ्लैटमधे राहाणाऱ्यांना मिळते,कर्जमाफी ही मिळते पण धरणगाव तालुक्यातील शेतकरी ला मिळत नाही. म्हणे ऑनलाइन अर्जच भरला नाही.आम्ही शेतकऱ्यांना अजून ऑफलाईन अर्ज करता येत नाही. आणि हे ऑनलाइन अर्जाचे धोंड आमच्या माथी मारले,सरकारने. या समस्यांची जाणिव ठेवून अभिषेक पाटील यांनी स्वतः श्रम घेऊन जळगाव शहरातील कॉलनीत जाऊन मोफत नोंदणी करण्याचा चंग बांधला आहे.
एकिकडे अभिषेक पाटील उमदा तरुण काम करीत असताना दूसरीकडे त्यांच्या मार्गावर अडथढे टाकण्यात जुनी नेतेमंडळी व्यस्त आहेत.म्हणे हा तरुण पुढे पुढे पळतो.आम्हाला सोबत घेत नाही. हळू चालत नाही. याच्या पायात अडखण टाकले पाहिजे, अशी तक्रार कालच मुंबई भेटीत वरिष्ठांकडे केली. आणि इकडे अभिषेक पाटील जळगाव शहरात गरीब,अशिक्षित लोकांना आयुष्यमान कार्ड बनवून देत आहेत.
या कामाबद्दल शहरातील गोरगरीबांनी या कामाचे कौतुक केले.

