संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी या गावी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाडची विद्यार्थी कृषीकन्या तांबे पुजा राजेंद्र हिने ग्रामीण कृषी जन जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रमाचा प्रारंभ गावाचे सरपंच अमोल जोंधळे ग्रामविकास अधिकारी व्ही डी केदारी, कर्मचारी सुनिल, संगणक अधिकारी सुनिता डेंगळे,तसेच ग्रामस्थ इतर पदाधिकारी यांच्या सोबत भेट घेऊन गावा विषयी माहिती गोळा केली त्या नंतर गावातील प्रगतशील शेतकरी संतोष बाबासाहेब तांबे यांच्या शेतात जावून पिकाचा आढावा घेतला पिकातील होणारा बदल माती परिक्षण सेंद्रिय पिक पद्धती बि-बियाणे औषध फवारणी आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
पशुपालन हा एक शेती जोडधंदा म्हणून कसा वापरता येईल यांची माहिती सांगितली कृषीकन्येचा प्रत्याशिक कामासाठी तिचे आई-वडील श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष साहेबराव नवले प्राचार्य डॉ अशोक कडलग डॉ अरविंद हारदे समन्वय प्रा तायडे कार्यक्रमाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

