shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीजितेंद्र पाटील यांची शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड..!!

प्रमोद चौधरी । जळगांव जिल्हा प्रतिनीधी:

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांची शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली. जितेंद्र पाटील हे मुंबईतील नामांकित हॉस्पिटल मधून गरीब व गरजू  रुग्णांना मोफत किंवा अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया साठी मदत कार्य करत राहतात. शस्त्रक्रिया करून देण्याचे कार्य गेल्या पाच वर्षापासून ते अविरतपणे करता आहेत. 

ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील अत्याधुनिक व अद्यवावत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे राबवतात. व गरीब व गरजू रुग्णांना रोग मुक्त करण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र पाटील यांना आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात तीन पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरातील प्रतिष्ठित पुरस्कार समजले जातात.
close