प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
सामाजीक बांधीलकी जपत रुग्नांची अंतकरणातुन सेवा करणारे डॉ. भाउसाहेब चाळक यांनी अन्नपुर्णा राहुल शिंदे या महिलेचे उपजिल्हा रुग्णालय केज येथे गर्भपिशवीला टाके घेऊन दहा हजार रुपये वाचवले .
सविस्तर वृत्त असे कि डॉ .भाऊसाहेब चाळक वैद्यकिय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय केज हे दर महिन्याला पंतप्रधान मातृत्त्व सुरक्षित योजना च्या माध्यमातुन त्या ठिकानच्या गर्भवती महिलांची तपासणी करण्याकरिता जातात .नऊ जुलै रोजी ते गर्भवती महिलांची तपासणी करण्याकरिता गेले असता त्या ठिकाणी अन्नपुर्णा राहुल शिंदे वय वर्ष २० तीन महिने गरोदर असणारी महिला त्यांना भेटली. त्या महिलेचा गर्भपात पहिला सहा महिन्यात तर दुसरा सात महिन्यात झाला होता . त्या महिलेला खाजगी दवाखान्यात टाके घेण्यासाठी दहा हजार रुपये सांगीतले होते .
त्यावेळेस डॉ .चाळक यांनी तपासणी करून आपली उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करून देतो असे म्हणुन सांगीतले. प्रत्यक्षात ७ जुलै रोजी टाके घेण्याची शस्त्रक्रिया पार पाडली. याकामी डॉ. सोळंके 'भुलतज्ञ, श्रीमती आरखडे, इंगळे, नासेर मामा, राऊत काका यांनी डॉ. भाऊसाहेब चाळक यांना सहकार्य केले व शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडुन गर्भवती महिलेचे दहा हजार रुपये वाचवले.
या स्तुत्य सामाजीक उपक्रमाबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. डॉ भाऊसाहेब चाळक यांनी मराठा सेवा संघाचे केज तालुका अध्यक्ष या पदावर असताना पण अनेकांना सहकार्य केले आहे. तसेच त्यांचे स्वतःचे कानडी रोड केज येथे मातोश्री हाॅस्पीटल असुन ते गरिबांचे डाॅक्टर म्हणून देखील केज व आसपासच्या भागात प्रसिद्ध आहेत.

