प्रतिनिधी : संजय वायकर
अ नगर:(दि .१७) : "माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब , पहा विचार करा लॉकडाऊन रद्द करता आले तर " या शिर्षका खाली शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती .
यावर मुख्यमंत्री कार्यालया कडून प्रतिक्रिया आलेली आहे . सौ .अनुरिता झगडे मानवाधिकार संघटना अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष यांनी सदर विषयाचे पत्र ( ईमेल ) दि .२८ जून रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते .
त्यावर मुख्यमंत्री कार्यालया कडून प्रतिक्रिया आलेली असून सौ .अनुरिता झगडे यांना ईंमेल प्राप्त झाला आहे . त्यात झगडे यांचा ईमेल पुढील कार्यवाही साठी मदत व पुनर्वसन विभागास पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे .

