शिरूर कासार । जि.बीड दि.१८जुलै :-
भाजपा प्रदेश उपाध्यक्षा ,भाजपा युवती आघाडीच्या प्रभारी मा. चित्राताई वाघ यांनी शिरूर कासार जि. बीड येथे कै. विशाल कुलथेंच्या कुटूंबियांची भेट घेऊन धीर दिला. या वेळी त्या म्हणाल्या ,संपूर्ण समाज कुलथे कुटूंबियांच्या पाठीशी आहे.त्यांच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील.त्यामुळे शुभम कुलथे, विकास कुलथे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,तालुकाध्यक्ष डाॅ.मधुसूधन खेडकर ,जि.प.सदस्य शिवाजीराव पवार, फय्याजभाई शेख,नगरसेवक गणेश भांडेकर तसेच सोनार समाज संघटनेच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
त्यानंतर चित्राताई वाघ यांनी येथील व्यंगचित्रकार व महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेचे राज्य प्रसिध्दीप्रमुख दीपक महाले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांचा महाले कुटूंबियांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या वतीने कुलथे कुटूंबियांना सहकार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. संघटनेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर कुलथे ,उपाध्यक्ष नितीन अधापुरे,सरचिटणीस बबनराव बेद्रे,सचिव शशांक डहाळे,रामूशेठ कुलथे, दिलीप बेद्रे,सरपंच ओमप्रकाश जोजारे, मराठवाडा सराफ फेडरेशनचे मंगेश लोळगे, गणेश बेद्रे,कैलास मैड यांची यावेळी उपस्थिती होती.
युवा सोनार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनेही कुलथे कुटूंबियांना सहकार्य केल्याबद्दल चित्राताई वाघ यांचा सन्मान करण्यात आला. संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षा व आय. टी. आय. इन्सट्रक्टर मनिषा महाले , ग्रामीण तालुकाध्यक्षा शिवकन्या जोजारे,शहराध्यक्षा सुरेखाताई शहाणे, शिवकन्या वेदपाठक, युवा सोनार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य दहिवाळ , बीड शहराध्यक्ष रोहन बेद्रे ,अरूण लोळगे,सतीश बेद्रे, आतिश चिंतामणी, पत्रकार गोकुळ पवार, भारत पानसंबळ,मनोज परदेशी यांची उपस्थिती होती.

