बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १००%निकाल.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ...
इंदापूर (प्रतिनिधी): बोराटवाडी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी जाहीर झाला असून इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल १००% लागला आहे.
या परीक्षेला एकूण ७५ विद्यार्थी बसले होते व यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा १००% निकाल लागला आहे.
सेमी इंग्लिश माध्यम मध्ये प्रथम क्रमांक - कोमल सुधाकर गायकवाड (९६.०० %), द्वितीय क्रमांक - स्वाती बबन ढेबे (९४.०० %), तृतीय क्रमांक - ज्ञानेश्वरी तुकाराम काळकुटे (९३.२० %) व मराठी माध्यम मध्ये प्रथम क्रमांक - प्रिया दत्तात्रय मोरे (९३.०० %), द्वितीय क्रमांक - आशा लालासो भंडलकर (९१.२० %), तृतीय क्रमांक - रूपाली नारायण खरात (९०.४० %) यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्था अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे संचालक उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरण पाटील, दत्तात्रेय सव्वाशे, दयानंद गायकवाड, कृष्णा बोराडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य दशरथ घोगरे व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले.

