सर्टिफाईड भ्रष्ट असताना राज्यपालांनी आमदार नियुक्ती करणे जाणिवपूर्वक चुक ठरू शकते ... शिवराम पाटील.
प्रतिनिधी : संजय वायकर
(दि .१८) : विधानपरिषदेत प्रामाणिक माणसे आमदार म्हणून गेली पाहिजे. म्हणून राज्यघटनेचे कलम १७१/५मधे अराजकीय १२ लोकांची नियुक्ती करण्याचे आधिकार राज्यपालांना दिले आहेत.
त्यात राजकीय पुढाऱ्यांची आणि अनुभव संपन्न, ज्युडिशियली सर्टिफाईड,ख्यातनाम चोरांची नियुक्ती होत असेल तर जनतेने विरोध केला पाहिजे.
हे शेण आहे,असे माहिती असूनही,धडधडीत दिसत असूनही जेवणात वाढणे कितपत योग्य आहे?म्हणजे शिरा उपलब्ध असूनही शेण खाणे ठिक आहे काय?
एखादा माणूस भ्रष्ट आहे किंवा नाही याबाबत माहिती नसेल तर आमदार नियुक्ती करतांना चूक होऊ शकते.पण सर्टिफाईड भ्रष्ट असताना राज्यपालांनी आमदार नियुक्ती केली तर जाणिवपूर्वक चूक करणे ठरते.का करावी ,अशी चूक?उद्धव ठाकरेंनी सांगितले म्हणून? शरद पवारांनी सांगितले म्हणून?
आम्ही लोक एकिकडे भ्रष्टाचार विरोध करतो,दुसरीकडे जाणिवपूर्वक भ्रष्ट माणसाला आमदार बनवायला सांगतो.म्हणजे आमचे नैतिक व राजकीय अधःपतन झालेले आहे .जे झाले ते पुरेसे नाही म्हणून आणखी अधःपतन करून घ्यायचे आहे.तरीही पुन्हा प्रश्न करायचा कि,भ्रष्टाचार का थाबत नाही?विकास का होत नाही?
नागरिकांनो,उद्धव ठाकरें मुख्यमंत्री असले तरी, शरद पवार माजी मुख्यमंत्री असले तरी ते बरोबरच आहेत असे समजणे,मानणे,समर्थन करणे म्हणजे आम्ही विचार करण्यास सक्षम नाहीत. आम्ही उघड उघड भ्रष्टाचाराला मदत करतोय. आम्ही आमचे भविष्य बिघडवत आहोत.आम्ही राजकारण करीत नाहीत. लूटारूंची टोळीचे सदस्य आहोत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शरद पवार पक्षाध्यक्ष आहेत,म्हणून ते बरोबरच असले पाहिजे, असा भ्रम ठेवू नये.तुम्ही,आपण सामान्य नागरिक सुद्धा तितकेच बरोबर असू शकता.कदाचित ठाकरे आणि पवार यांच्या पेक्षा जास्त. आता या लोकांकडे सत्ता आहे म्हणून ते हुषार आहेत,प्रामाणिक आहेत ,बरोबर आहेत,असा गैरसमज करणे म्हणजे स्वताच्या मेंदुचे आस्तित्व नाकारणे आहे.
ठाकरे आणि पवार चुकीचे आणि राज्यपाल बरोबर असा मुद्दा न धरता मी किती चूक आणि किती बरोबर ? असा विचार केला पाहिजे.आम्ही सेना ,राष्ट्रवादी चे,आम्ही महाराष्ट्राचे आणि राज्यपाल भाजपचे ,हिमाचल चे म्हणून आमचेच बरोबर आणि राज्यपाल चूक असे समजणे म्हणजे राजकारण नसून द्यूत आहे.ज्याचा परिणाम नाश असतो.राज्यपालांचा नव्हे, आमचा.राज्यपाल वर्षे, दोन वर्षे महाराष्ट्रात राहातील आणि हिमाचल किंवा अन्य प्रदेशात निघून जातील पण आम्हाला येथेच महाराष्ट्रात जगायचे आहे,मरायचे आहे.तर मग,आम्हीच आमच्या हातून महाराष्ट्र चोरांना सोपवायचा का?असा प्रश्न पडतो.राज्यपाल हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नाहीत. उलट त्यांनी आधिकतम भ्रष्ट लोकांना विधानपरिषदेत नियुक्ती दिली असती.पण तेच भ्रष्ट लोकांची नियुक्ती अडवून धरत असतील तर ते आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे आहे.आणि आपण ठाकरे आणखी पवार कुळातील माणसे भ्रष्ट लोकांना विधानपरिषदेत नियुक्ती करू ईच्छीत असतील तर आमच्यासारखे करंटे आम्हीच.
१२ कोटीच्या महाराष्ट्रात धड १२ माणसे प्रामाणिक नसतील का?ज्यांना विधानपरिषदेत आमदार म्हणून नियुक्ती देणे योग्य ठरेल. पण मुळातच आम्हीच भ्रष्ट असू तर आम्हाला प्रामाणिक माणसे दिसणारच नाहीत. दिसली तरी आवडणारच नाहीत.तरीही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा मराठा करीत असतो.छे!आम्ही छत्रपतींचे वारसही नाहीत आणि मराठा ही नाहीत." कुछ तो गडबड है,दया!पता करो ,दालमे काला है या पुरी दालही काली है?"
...शिवराम पाटील.
9270963122
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

