खेड । शिवभोजन थाळी केंद्र हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. परंतू खेड तालुक्यातील शिवभोजन केंन्द्रावर अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्यामुळे मा. तहसीलदार यांना शिवसेनेचे निवेदन देण्यात आले .
खेड तालुक्यामध्ये पाच ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र चालू आहे. शिवभोजन केंन्द्रावर शिवभोजन थाळीमध्ये जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे मिळत आहे. शिवभोजन केंन्द्रावर स्वच्छता पाळली जात नाही .त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर नागरिकांचा आरोग्यास त्रास होत आहे
दुसरी गोष्ट अशी निदर्शनास आली की त्या ठिकाणी लोक जेवण करत नाही . त्यांचा सुद्धा फोटो व नाव शिवभोजन ॲप वरीती अपलोड करायच आणि अनुदान लाटण्याच काम करायचंय अशी भोगस पद्धत सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे.
शिवभोजन थाळी केंद्र हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. परंतु तालुक्यातील शिवभोजन केंन्द्रावर जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याने शिवभोजन थाळी केंद्र या उपक्रमाची प्रतिमा मलिन होत आहे.
तालुक्यातील सर्व शिवभोजन केंन्द्रांची तपासणी करण्यात येऊन जेवण विषयक दर्जा ,तेथील सोयी सुविधा व शासन निर्णयामधील अटी शर्ती यांची पडताळणी करण्यात येऊन शिवभोजन केंन्द्र योजना यशस्वीरित्या राबविणेबाबत आपलेमार्फत योग्य त्या सुचना देण्यात यावी ही विनंती करण्यात आली.
या वेळी निवेदन देताना भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ लांडे, कु.हेमंत टाकळकर ,कु.अमोल चौधरी ,कु प्रमोद बढे,कु.स्वप्नील जैद उपस्थित होते.

