नूतन माध्यमिक विद्यालय कौठाळी इयत्ता दहावी चा १०० टक्के निकाल..!!
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील कौठळी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला असून यामध्ये कु. निकिता हनुमंत मारकड ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक,कु.आमिषा सदाशिव भंडलकर ९०.०० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक कु. निकिता संजय बोराटे ८९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक विद्यालयामध्ये मिळवला असून त्यांचे विशेष अभिनंदन फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर फुले यांनी केले असल्याची माहिती मुख्याध्यापक संजीव नाळे यांनी दिली.
ते म्हणाले की,कौठळी या गावामध्ये १९९५ च्या अगोदर फक्त इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षणाची सोय होती. पुढील शिक्षणासाठी मुले-मुली शेजारच्या गावी जात होती. परंतु फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. अॅड. सिध्देश्वर फुले यांनी कौठळी गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी माहे - जून १९९५साली नूतन माध्यमिक विद्यालय सुरू केले. आज त्या विद्यालयामध्ये इयत्ता ५ वी ते १०वी पर्यंत च्या वर्गात एकूण २८५ विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे या शाळेत १५१-मुली आणि १३०- मुले शिक्षण घेत आहेत. विदयालयास सतत कौठळी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य करीत असते. या गावामध्ये संस्थेने सुसज्ज इमारत उभी केली आहे. या शाळेत मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने ई-लर्निंग व सेमी ची सोय केली आहे.गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिकता यावे. यासाठी संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील नागरिक या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. संस्थेने या गावामध्ये ही शाळा सुरू केल्या मुळे गावातील मुलींची शिक्षणाची सोय चांगली झाली आहे.
सन २०२०- २०२१ या इयत्ता दहावीच्या वर्गात एकूण ४३ विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना काळातही चांगला अभ्यास करून उत्तीर्ण झाल्यामुळे १०० टक्के निकाल लागला .त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांनी चे हार्दिक अभिनंदन.
या कालावधीमध्ये यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कौठळी गावातील सरपंच सौ नंदा चोरमले, उपसरपंच सुनील खामगळ, पोलीस पाटील रामभाऊ पाटील, भाजपचे इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख, साहेबराव पिसाळ. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन सरचिटणीस वसंत मारकड, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख हमा पाटील, प्रकाश मारकड, ,सुभाष पिसाळ ,बापू चितारे, अनिल पवार, हनुमंत मारकड इत्यादी ग्रामस्थांनी विद्यार्थी शिक्षक यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

