shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत फोर्ज लिमिटेड बारामती तर्फे "स्किल इंडिया डे"सहभागात प्रोजेक्ट सादरीकरणाच्या स्पर्धेत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक कळंबच्या विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक..!!

भारत फोर्ज लिमिटेड बारामती  तर्फे "स्किल इंडिया डे"सहभागात प्रोजेक्ट सादरीकरणाच्या स्पर्धेत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक कळंबच्या  विद्यार्थ्यांना  तृतीय पारितोषिक..!!
फोटो - ज्ञान कला क्रीडा कृषी प्रतिष्ठानचे  वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार
इंदापूर:(१९ जुलै २०२१)भारत फोर्ज लिमिटेड बारामती  तर्फे *स्किल इंडिया डे* दिनांक १५ जुलै २०२१ रोजी साजरा करण्यात आला याप्रसंगी भारत फोर्ज कंपनीने प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ठेवली होती .या कॉम्पिटीशनसाठी  या महाराष्ट्रातून जवळपास १०० प्रोजेक्ट ग्रुपने सहभाग घेतला होता 
यामध्ये ज्ञान कला क्रीडा कृषी प्रतिष्ठानचे  बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक कळंब वालचंदनगर ता. इंदापूर जि.पुणे   मधील मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रसाद पाठक काशिनाथ दुबळे रोहन लांडगे व वैभव जगताप यांनी *शुगर केन प्लेटिंग मशीन* या प्रोजेक्टचे सादरीकरण केले या स्पर्धेमध्ये ह्या ग्रुपला तृतीय पारितोषिक देण्यात आले. सदरील प्रोजेक्टसाठी प्रा. चव्हाण यू जे   सर  या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पारितोषिक मिळाल्याबद्दल ज्ञान कला क्रीडा व कृषी प्रतिष्ठान चे अध्यक्ष उत्तम फडतरे व इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा संस्थेचे सचिव  दत्तात्रय आबा फडतरे तसेच पॉलिटेक्निकचे प्राचार्य एन एम  ठोंबरे  यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
close