गोखळी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गरजू विधवा महिलांना साडीचोळी वाटप संपन्न.
इंदापूर.:(दि.१० जुलै २०२१) ताई दादा सप्ताहांतर्गत गोखळी येथे गरीब गरजू महिलांना साडीचोळी वाटप कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व पैलवान सचिन तरंगे उपसरपंच ग्रामपंचायत गोखळी यांचे मित्र परिवाराच्या यांच्यावतीने( दि १० जुलै) रोजी दुपारी ३:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन गोखळी ता. इंदापूर जि. पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले की, गोखळी गावाच्या विविध विकास कामासाठी मी कमी पडणार नाही . गरीब गरजू निराधार महिलांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे .
असेच ते पुढे म्हणाले की, सचिन तरंगे यांनी आज आयोजित केलेल्या साडीचोळी वाटप कार्यक्रम हे अत्यंत मोलाचे कार्य असून. त्यांच्या हातून असेच समाजकार्य इथून पुढच्या काळात होत जावे.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष अतुल झगडे, इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक कांग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत तरंगे, सरपंचअलका बापू पोळ, सचिन खामगळ ,तुकाराम करे, बाळासाहेब हारनवळ, बजरंग राऊत, राजाराम तरंगे, बापू पोळ, महानवर गुरुजी, माऊली वाघमोडे, बाळासाहेब चितळकर, राघू पारेकर,लेमन गावडे, सुहास बुटे, सोमनाथ झगडे, नामदेव झगडे, तुकाराम वाघमोडे , सचिन बारवकर, संतोष जाधव, ज्ञानदेव गोफने,माऊली शिंदे, महादेव वाघमोडे,नितीन गोफने, प्रदीप वाघमोडे व
गावातील ग्रामस्थ गरजू महिला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सचिन तरंगे आभार मानताना म्हणाले की, राज्याचे राज्यमंत्री भरणे यांच्यासारखे कार्यतत्पर नेतृत्व आमच्यासारख्यांना लाभले असून या नेतृत्वाकडून आपली कामे नेहमी त्यांच्या माध्यमातून करत असतो .

