shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवचेतना केज च्या वतीने तृतीयपंथी यांना किराणा किटचे वाटप..!!



प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
नवचेतना सर्वागीण विकास केंद्र केज च्या वतीने आज केज मधील तृतीयपंथी यांना किराणा किट चे वाटप करण्यात आले .

सविस्तर वृत्त असे कि केज येथीन संर्वांगीन विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवुन सामाजीक कार्य करणारी संस्था नवचेतना सर्वागीण विकास केंद्र हे कार्य करत आहे  .          
या संस्थेच्या वतीने आतापर्यंत निराधार, गरीब, कष्टकरी यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. 

आज सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तृतीयपंथी गौरीताई शिंदे यांना व त्यांच्या सर्व सहकारी यांना नवचेतना सर्वागीण विकास केंद्र केजच्या वतीने किराणा किटचे तसेच सांड्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नवचेतना सर्वागीण विकास केंद्राच्या मनिषा घुले तसेच  सर्व पदाधिकारी ,  गौरीताई शिदे व त्यांच्या सर्व सहकारी व आदर्श पत्रकार संघाचे सचिव गौतम बचुटे तसेच आदर्श पत्रकार संघाचे माजी ता. अध्यक्ष विजय आरखडे हे उपस्थित होते. या सामाजीक उपक्रमाबाबत नवचेतना सर्वागीण विकास केंद्रांचे कौतुक केले जात आहे .
close