shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा बाजार समितीचे सभापती बंडगर पुन्हा तोंडघशी, बेकायदेशीर सभा रद्द करणेबाबत सहाय्यक निबंधकांनी लेखी कळविले..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

करमाळा : (दि . १९ ) :  करमाळा बाजार समितीचे सचिव निवडीच्या ठरावाला स्थगिती मिळती न मिळती तोच व त्याच दिवशी सभेचा अजेंडा काढल्याचे दाखवत १९ जुलैला सभा घेणेचा सभापतींचा बेकायदेशीर प्रयत्न गुगळे व दोशी या सदस्यांच्या तक्रारीमुळे हाणून पडला आहे . व विशेष बाब म्हणजे सभेचा अजेंडा काढलेची सचिवाना कसलीही माहिती नाही, बाजार समितीच्या संचालक मंडळ सभेचा अजेंडा बाजार समितीच्या कार्यालयातून काढला जात नाही, त्यावर जावक क्रमांक व शिक्का नाही . कित्येक सदस्यांना अद्यापही अजेंडा मिळाला नाही .अशा प्रकारे अनागोंदी कारभार सध्या बाजार समितीत सुरु आहे . 




सभेचा अजेंडा नियमानुसार १० दिवस अगोदर काढला पाहीजे अशी उपविधीत स्पष्ट तरतूद आहे असे असताना व २९ जुन रोजी जिल्हा उपनिबंधक यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे चा विषय अपेक्षीत असताना २१ मे रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणेबाबतचा एकच विषय घेवून १९ जुलै रोजी सभा आयोजीत करणेचा सभापतींचा प्रयत्न होता . यामधे कालच सेवानिवृत्त सचिव सुनील शिंदे यांनी त्यांना देय असणाऱ्या रकमा देणेस सभापती बंडगर टाळाटाळ करत असून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे . यामागे नेमका काय " अर्थ " दडला आहे अशीही सर्वत्र चर्चा सुरु आहे . हि सभा घेवून सेवानिवृत्त सचिव सुनील शिंदे यांना देय असलेल्या रकमा देणेचा मंजुर ठरावाचे प्रोसेडींग कायम न करता रद्द करणेचा घाट सभापतींनी घालणेचा प्रयत्न केला होता असे खात्रीलायक रित्या समजते . बाजार समितीचे सभापती संस्थेचे कामकाज चालविण्यास सक्षम व समर्थ नसल्याचेच या सर्व घटनांवरून दिसून येत आहे . 


सचिव प्रतिक्रिया : - सभेबाबत मला कसलीच माहिती नाही . गुगळे व दोशी यांनी विचारणा केले नंतर व सहाय्यक निबंधकांचे पत्र मिळालेनंतर च समजले . सहाय्यक निबंधक यांचे पत्रानुसार कायदेशीर कामच करणार, बेकायदेशीर बाबींची अंमलबजावणी केली जाणार नाही . बाजार समितीचे कामकाज व्यवस्थित चालू असून दैनंदीन सर्व कामे संस्थेचे हित व प्रगती डोळ्यासमोर ठेवून सर्व कर्मचारी प्रामाणीकपणे करीत आहेत . विठ्ठल क्षिरसागर , (कार्यरत सचिव कृ . उ . बाजार समिती करमाळा )

close