प्रतिनिधी : रफिक शेख
टाकळी काझी : (दि .१९) : नगर तालुक्यातील टाकळी काझी या गावात गेल्या ३ वर्षापासून सावली फाउंडेशन च्या माध्यमातून हरीत चळवळ चालु आहे... परिसरात २७० पेक्षा जास्त झाडे जाळ्या सहीत रोपन करुन १०० टक्के संवर्धन केल आहे.. मोकळया जागेत वड, पिंपळ व वस्ती च्या ठिकाणी बहावा, करंज, कडुलिंब, शिसव, कांचनार, नांद्रुक, बकुळ, पांगारा, कदंब, आवळा, जांभळ या झाडांचा वृक्षारोपणात समावेश आहे.
सावली फाऊंडेशन च्या सर्व मित्र परिवाराचे अनमोल योगदान या मोहिमेत आहे. पहाटे, दुपारी, व रात्रीही वृक्ष संवर्धनासाठी कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत सोशल डिस्टनसींगच पालन करत झाडांना पाणी देण्याच मोलाची काम केले आहे...
आईच्या झाड, आठवणीतील झाड, वाढदिवसाच झाड आशा विविध संकल्पना वापरुन गावकऱ्यांनाही वृक्षारोपण मोहीमेत सामील करुन घेतले आहे त्याचा परिणाम म्हणून परिसरात लहान थोरांना वृक्षारोपण व संवर्धनाची आवड निर्माण झाली आहे...
सावली फाऊंडेशन च्या माध्यमातून मे महिन्यात वृक्षारोपणाची सुरवात होते... जागा निवडने,जेसीपी ने खड्डे खांदने, काळी माती खड्यात भरणे, जाळ्या तयार करने, चांगला पाऊस पडला कि जाळ्या सहीत वृक्षारोपण करने व वर्षभर मुला प्रमाने प्रत्येक झाडांची काळजी घेणे... १०० टक्के झाड जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो... उन्हाळ्यात पाणी व पावसाळ्यात जनावरांपासून संरक्षण करणे हेच या सावली फाऊंडेशन चे मुख्य कार्य आहे.
सावली फाऊंडेशनच्या या कार्यात सर्व मित्र परिवार, गावकरी, मदतनिधी देनारे वृक्ष प्रेमी व ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य कायम लाभले आहे.
नुकतेच टाकळी काझी येथील मोरया हॉस्पिटलचे संचालक डॉ. रोहित करांडे यांनी सावली फाऊंडेशनला
मास्क पुरवून मदतीचा हात दिला आहे.
सावली फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा...


