संतप्त व्यापाऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा..!!
राहुरी प्रतिनिधी: राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ साहेब यांनी काल रविवार दिनांक २५ जुलै रोजी राहुरी बाजार पेठेतील दुकान उघडे का ठेवले? या कारणामुळे नवी पेठ येथील एका प्रतिष्टीत व्यापाऱ्याला मारहाण केली आहे म्हणून व्यापारी वर्गात एक प्रकारची संतापाची लाट उसळली आहे तद्नंतर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, डॉक्टर विजय मकासरे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी राहुरी पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन केले आणि पोलीस निरीक्षक यांना त्वरित निलंबित करावे अशी घोषणाबाजी केली.
आणि बेधडक पणे मारायला काय मोगलाई माजलीय आहे काय? अशी विचारणा केलि आणि तूम्ही गरीब व्यापार्यानाच त्रास देता, आम्हीं वरीष्ट पोलिस अधिकारी आल्यावरचर्चा करूं मगच काय तो निर्णय घेऊ, तसेच उद्यापासून राहुरी व्यापारी बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा ईशारा व्यापारी यांनी दिला त्यानंतर पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी माफी मागितली मग कुठतरी या आंदोलनावर तात्पुरता पडदा पडला आहे.
झाले असे की शनिवार, आणि रविवार या दोन दिवशी जनता कर्फुयु असल्याकारणाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बजार पेठ बंद ठेवावी अशी कोविड सुसंगत नियमावली आहे.
-राहुरी पेठेतील दुकाने बंदच असतात परंतु नवी पेठ या भागातून पोलीस निरीक्षक दुधाळ आणि त्यांचे सहकारी हे फेरफटका मारत पाहणी करत होते , पाहणी करत असतांच त्यांना खेडेकर यांचे भोले प्रसाद हे दुकान उघडे दिसले त्यांनी त्यास जवळ बोलावून घेतले आणि दंड भरण्यास तयार आहेत का? दंडाची रक्कम हि रुपये दहा हजार इतकी राहील असे सांगताच लगेचच त्या व्यापाऱ्यांने सांगितले की साहेब माझी आवरा-आवर सुरू आहे.
आत्ता लगेच मी दुकान बंद करणारच आहे असे सांगताच पोलीस निरीक्षक यांनी गाडीतून उतरून व्यापाऱ्याच्या तोंडात मारली. काही वेळातच संतप्त झालेले व्यापारी एकत्रितपणे गोळा झाले आणि सर्वच्या सर्व व्यापारी राहुरी पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक दुधाळ यांच्या कार्यालयासमोर गेले आणि त्यांनी पोलीस निरीक्षक दुधाळ यांना जाब विचारला की तुम्ही या व्यापाऱ्याला कोणत्या नियमानुसार मारले तुम्ही सबंधित व्यापाऱ्याला दंड करू शकता, पण असे मारहाणीचे प्रकार का करता? अशी विचारणा संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दुधाळ यांना केली आणि तुम्ही माफी मागितल्याशिवाय आम्ही इथून अजिबात जाणार नाही असा इशारा देखील दिला.; "तसेच हे वागणं बरं नव्हं" अशा प्रकारचा सुर काहिसाचा निघत होता
_“या पुढे कोणत्याही व्यापाऱ्यांवर अशा प्रकारे होणारा आन्याय खपून घेतला जाणार नाही. आधीच लॉक डाउनमुळे व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडलेले असतांना त्यात पुनः दंडाची तरतूद आणि अशी मारहाण म्हणून या सर्व प्रकरणात पोलीस निरीक्षक दुधाळ यांचे निलंबन व्हावे.-सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे.”
अखेर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी मागितल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला आहे यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, बाळासाहेब उंडे, प्रकाश नरवडे, प्रकाश पारक, डॉक्टर विजय मकासरे, केमिस्ट असोसिएशनचे नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, अनिल सबलोक, संजय बेदमुथा यासह अनेक व्यापाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन आपला निषेध व्यक्त केला.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे 📲7350591600

