shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ट्रेकिंगसाठी पर्यटकांची करंजाडे टेकडीला पसंती



विनया मेढेकर । पनवेल :
कोरोना आणि अतिवृष्टी मुळे पर्यटन स्थळे धोकादायक झालेली असल्यामुळे बहुतेक ठिकाणी जायला प्रतिबंध करण्यात आला आहे ....परंतु  लॉकडाऊन मुळे घरात राहून कंटाळलेले पर्यटक बाहेर पडतातच...अशावेळी त्यांनी नवीन शक्कल लढवून नवीन नवीन निसर्ग रम्य ठिकाणी शोधून काढलीत....अशीच एक जागा या लॉकडाऊन वेळेत प्रसिद्ध झालीय ती म्हणजे करंजाडे टेकडी....पनवेल पासुन... कमी वेळात ....कमी खर्चात अगदी मनमुराद निसर्गाचा आनंद घेता येतो...शिवाय काही मिनिटात घरी येता येत असल्याने थोड्या वेळातच   लहान थोर आपल्या कुटुंबासमवेत या भागात निसर्गाचा अनुभव घेत आहेत. शनिवार -रविवार निसर्गप्रेमीची मोठ्या प्रमाणात गर्दी ईथे पाहायला मिळते.

कंरजाडे टेकडी पर्यटकांना आकर्षित करत आहे. टेकडी वरून पनवेल परिसराचा सुदंर नजरा दिसतो .टेकडी वर एक पिर बाबाच मंदिर आहे. आजू बाजुला झरे वाहतात, गारगार हवा..या मुळे ही टेकडी निसर्गप्रेमीच आकर्षणबिंदु ठरत आहे.पनवेल पासून 4 ते 5मिनटच्या अंतरावर  कंरजाडे हील आहे. जे.एन.पी.टी. रोड बाजूने जातो..शिवाय गाढी नदी बाजूने वाहते...!

पावसाळ्यात जिल्ह्यात  विविध धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. बऱ्याचदा या भागांमध्ये जीवितहानीच्या देखील घटना घडल्या आहेत. दुसरीकडे राज्यात आता मान्सून  होत हाहाकार माजवला आहे. याशिवाय राज्य सरकारने नुकतेच निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. 

अशावेळी सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

close