shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील संक्रपुर येथील सरपंचानेच फोडले दोन जणांचे डोके म्हणुन ७ जणांविरोधात गुन्हा दाखल..!!

राहुरी: तालु्क्यातील संक्रापुर येथिल सरपंच रामा पांढरे यांनी आणि त्यांच्या असलेल्या टोळीने ८ ते १० जणांना बेदाम मारहाण केल्याप्रकरणी सात जणांच्या विरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर 

यामधे दोघे जण अतिगंभिर जखमी झाले असुन त्यांच्यावर श्रीरामपुर येथेल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.

         


चारीला सिमेंटचे पाईप टाकण्याच्या कारणांमुळे संक्रापुर येथिल सरपंच रामा पांढरे व त्यांच्या ७ साथीदाराने दोन जणांचे लाकडी दांडे व दगडाने डोके फोडल्याची घटना घडली आहे.

याबाबत राहुरी पोलिस ठाणेत गु.रजि.नं.556/2021 भा.द.वि. कलम 324,337,323,143,147,148,149,504,506 प्रमाणे  राजेंद्र संजय जगताप वय वर्ष २४ वर्षे,धंदा शेती राहणार संक्रापुर ता.राहुरी यांनी आरोपी १) जाफर शेखलाल शेख २) आखिल युसुफ शेख ३) रामदास बाळासाहेब पांढरे ४) आखिल शेख गारवाले ५) बाबासाहेब अंबिर शेख ६)ऋषीकेश बापु पांढरे सर्व रा.संक्रापुर ता.राहुरी पोपिज नानाभाई शेख रा.दवण गाव ता .राहुरी यांच्या विरोधात फीर्याद दाखल केली आहे.



सदर घटना हि  दि.१४ जुलै २०२१ रोजी लांडेवाडी संक्रापुर शिवारातील फिर्यादीच्या राहते घरासमोरील रस्त्यालगत घडली आहे. 

फिर्यादी हे त्याचे घरा समोर चालु असलेल्या रोडच्या कामा जवळच उभे असतांना यातील आरोपी यांनी  गैरकायद्याची मंडऴी जमवुन रोड लगत असलेल्या चारीला सिमेंटचे पाईप टाकण्याच्या जागेवरुन  फिर्यादीस व फिर्यादीचा भाऊ यांच्याशी वाद घालु लागले असता फिर्यादी वरील आरोपीत यांना समजावुन सांगत असताना आरोपी जाफर शेख यांनी तेथे पडलेला दगड हातात घेऊन फेकुन फिर्यादीचा चुलत भाऊ यांचे डोक्यात मारला तेव्हा त्याचे डोक्यास जखम झाल्याने व त्यातुन रक्त येवु लागल्याने फिर्यादी त्यास धरण्यासाठी गेला असता आरोपीत रामदास बाळासाहेब पांढरे याने त्याचे हातातील लाकडी काठीने फिर्यादीचे उजव्या कानाच्या जवळ मानेवर मारले व वरील आरोपीत यांनी फिर्यादीस व फिर्यादीचे चुलत भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फीर्यादीत राजेद्र जगताप यांनी म्हटले आहे. सदर घटनेचा तपास हा राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संजय राठोड हे करत आहे.                            


बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600 

close