shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांचे कडून सर्प मित्र कृष्णा पोपळघट यांचा सन्मान..!!

राहुरी तालुका यांच्या विद्यमाने रविवार दि. १८ रोजी राहुरी येथील योगा केंद्र, गोकुळ कॉलनी येथे भव्य रक्तदान शिबीर, विमा पोलिसी वितरण समारंभ व कोव्हीड योद्धा पुरस्कार वितरण आयोजित केले होते. त्यामध्ये कोरोना काळात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या हिताचे जे काम केले, त्यामध्ये सर्वच प्रकारच्या घटकांचा समावेश आहे त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून तसेच त्यांना पुढील काळात प्रेरणा मिळावी म्हणून एक आगळा - वेगळा समारंभ संपन्न झाला तसेच त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित देखील करण्यात आले.

राहुरी येथील रहिवासी असलेल्या सर्पमित्र म्हणून ओळख आसलेले कृष्णा पोपळघट यांनी कोरोना काळात अनेक ठिकाणी अनेक वेळा माणसांपासून साप व इतर वन्य जीवांचे तसेच सापांपासून माणसांचे प्राण वाचवून त्यांना जीवदान दिले. 

यावेळी सापांपासून तर जीवाला धोका होताच पण त्यात कोरोना सारख्या आजाराने देखील भर घातल्याने आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रात्री अपरात्री  आपले कार्य चोख पणे पार पाडले. कधीही कुणाचाहि कॉल आला तर त्याच क्षणी त्याठिकाणी धाव घेऊन तेथील असलेल्या सर्प, नाग याला ताब्यात घेऊन निर्जळ स्थळ बघून सोडून दिले त्याबद्दल त्यांना श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक मा. संदीपजी मिटके साहेब यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले, यावेळी राहुरीचे नायब तहसीलदार मा. गणेश तळेकर साहेब, जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. सुनिल पोखरना साहेब, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष मा.प्रा. सुभाष चिंधे, प्रेस संपादक व पत्रकार संघांचे राहुरी तालुकाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र वाडेकर, जेष्ठ पत्रकार मा. सुभाष मुदळ, राहुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.                         
बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600
close