प्रतिनिधी । रफिक शेख:
नगर पुणे हायवे वरती कामरगाव शिवारात काही दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये भर पावसात लोक जखमी अवस्थेत पडलेले पाहून आ.निलेश लंके यांचे तरुण सहकारी सिद्धांत आंधळे यांनी स्वतच्या जीवाची पर्वा न करता या सर्व जखमी व्यक्तींना रुग्णवाहिका बोलवून दवाखान्यांमध्ये भरती केले.
यामध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांचे त्वरित रुग्णालयात दाखल केल्यामुळे प्राण वाचले. त्यांच्या पाठीवर आज तालुक्यातून शाबासकीची थाप पडत आहे. ते म्हणाले की नेते हे आमचं प्रेरणास्थान आहे. नेत्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने काम करत राहायचं. यावेळी आ.लंके यांनी देखील आपल्या लाडक्या सहकऱ्याने तोंड भरून कौतुक केले.व तुझा येणार भविष्यकाळ उज्ज्वल आहे अशा प्रकारे सदिच्छा शुभेच्छा देखील दिल्या..यावेळी उपस्थित सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी साहेब, सरपंच तुकाराम कातोरे, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

