नारायणडोहो । (प्रतिनिधी)-रफिक शेख:
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत दरेवाडी मांडवा रस्त्याचे काम झालेले असून सध्या होत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे साइडपट्यावरील मुरूम वाहून गेलेला आहे.
दरेवाडी- नारायणडोहो- उक्कडगाव, मांडवा, लोणी सय्यदमीर, पिंपळा, खरडगव्हाण, खुंटेफळ या रस्त्यावर वाहतुकीची रीघ लागलेली असते मात्र या रस्त्यावर सध्या राजरोसपणे छोटे-मोठे अपघात घडत असेल रस्ता अपघात मार्ग रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे
दरेवाडी ते मांडवा रस्त्यावरील साइडपट्ट्यावर काटेरी गवत, अनेक काटेरी झाडांच्या फांद्या रस्त्यालगत असल्यामुळे दुचाकीस्वारांना या रस्त्याने प्रवास करणे मुश्कील झाले आहे . यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गाडी ओव्हरटेक करत असताना अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. यात अनेक जणांचे बळीदेखील गेले आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत.
तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत पावसाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाभळी रस्त्यावर आलेल्या आहेत त्यामुळे वाहने चालविण्यास वाहनधारकांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेचा मुरूम वाहून गेल्याने मोटारसायकल स्वार गाडी घसरून पडत आहेत.
सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदार कडे पाच वर्षकरिता आहे. त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती व बाभळी मशिनच्या साह्याने काढुन टाकण्या संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी दरेवडीचे उपसरपंच अनिल करांडे ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गाजनन भांडवलकर,ग्रामपंचायत सदस्य सचिन बेरड,अक्षय भिंगारदिवे,संदीप बेरड,बाबासाहेब वीर,अशोक माधव बेरड,बबन ज्ञानदेव बेरड,गणेश बडेकर, ज्ञानेश्वर बेरड आदी उपस्थित होते.

