shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलेचे फेसबुक अकाऊंट हॅक करुन मागितली खंडणी पनवेलमधील घटना; अज्ञातावर गुन्हा दाखल



 विनया मेढेकर । पनवेल :-
पनवेल ।   लाँकडाऊन मध्ये सध्या तंत्रज्ञानाचे वापर मोठ्या प्रमाणात वाढल आहे.सोशल मीडिया म्हणजे  जीवन झाले आहे.  माणुस अन्नाशिवाय राहु शकतो पण सोशल मीडियापासुन दूर राहु शकत नाही.  सोशल मीडियाचा काही जण उपयोग करून घेतात,  तर काहि जण याचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. सोशल मीडियाचे खाते हॅक करून त्यांची वैयक्तिक माहिती,फोटो, फोन नंबर चोरने, अफवा पसरवणे,हँनी ट्रॅप असे प्रकार सध्या समोर येत आहेत. खांदेश्वर परिसरात आदई गावात अशीच घटना घडली आहे.

पनवेल तालुक्यातील आदई गावात राहणार्‍या महिलेचे फेसबुक अकाऊंट हॅक करुन, अश्लील फोटो तयार करत खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
फिर्यादी हे आदई गावत राहणारे असून  फायनान्समध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात . त्यांच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केले. त्यावरील व्हॉट्सअ‍ॅप नंबर मिळवला आणि फेसबुक अकाऊंटरवर अपलोड असलेले फोटो क्रॉप करुन फिर्यादीच्या पत्नीचे अश्लिल फोटो तयार केले. ते फोटो व्हॉटअ‍ॅप क्रमांकावर पाठवून फिर्यादीकडे त्याद्वारे खंडणीची मागणी केली.खंडणीचे पैसे दिले नाही तर पोलिसात तक्रार करेन, त्याचबरोबर अश्लील फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली.

 याप्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन खांदेश्वर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 385, 500, 504, 506, 507, तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 की 67, 67 अ प्रमाणे या तक्रारीवरून पोलिसांनी  वरील नमुद कलमान्वये, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे आहे .तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खांदेश्वर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.सदर गुन्हाचा तपास पोलीस निरिक्षक टाकने करित आहेत.
close