shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरगुडे ग्रामपंचायतीलाग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय तृतीय क्रमांकांचा पुरस्कार प्रदान.

निरगुडे ग्रामपंचायतीला
ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय तृतीय  क्रमांकांचा पुरस्कार प्रदान.

इंदापूर प्रतिनिधी: (३० जुलै २०२१)ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या वतीने देण्यात येणारा महा आवास अभियान पुरस्कार २०२०-२१ राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय  उत्कृष्ट ग्रामपंचायत रमाई ,शबरी ,पारधी घरकुल योजने अंतर्गत तृतीय क्रमांकांचा पुरस्कार निरगुडे ग्रामपंचायतीस जाहीर झाला आहे. प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सभापती स्वाती शेंडे व उपसभापती संजय देहाडे आणि गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते ग्रामपंचायत निरगुडे सरपंच सौ. बायडा खंडाळे व सदस्य हनुमंत काजळे -पाटील ,सौ. गौरी सोनवणे, देवेंद्र राऊत या  पदाधिकारी व लाभार्थी विशाल खंडाळे तसेच ग्रामसेवक गणेश जाधव यांच्याकडे सदर पुरस्कार प्रधान करण्यात आला. 
यावेळी निरगुडे ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व  लाभार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
महा आवास अभियान ग्रामीण तालुकास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचाय रमाई, शबरी, पारधी घरकुल राज्य योजना यामध्ये प्रथम क्रमांंंक भाटनिमगाव ग्रामपंचात, द्वितीय बेलवाडी, तृतीय निरगुडे या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्हह देऊ गौरवण्यात आले.
यावेळी  पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, प्रदीप जगदाळे,देवराज जाधव, प्रदीप काळे , सारिकाताई लोंढे, उपस्थित होते.
close