प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यात गेली दहा दिवस कृषि संजीवनी मोहीम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा बीड श्री डी. जी. मुळे यांच्या मार्गदर्शना नुसार व तालुका कृषी अधिकारी केज चंद्रकांत देशमाने यांच्या नियोजनातून केज तालुक्यातील सर्व गावामध्ये ही मोहीम सुरु होती . त्याच अनुषंगाने मौजे नायगाव येथे या मोहिमेची सांगता करण्यात आली.
यावेळी खतांचा संतुलित वापर कसा करावा तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत असून, जमिनीतील सामू बदलत आहे,अयोग्य पिक पद्धतींचा वापर, रासायनिक खतांचा असमतोल वापर, अमर्याद सिंचनाचा वापर रासायनिक खते देण्याची पद्धत वेळ आणि मात्रा जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म,कमी होत चाललेली सूक्ष्मजिवाणुची संख्या जमिनीमध्ये वाढत चाललेल्या अव्याढव्य खताच्या प्रमाणामुळे एक इंच सुपिक थर हा नापीक होत असून पाण्याबरोबर उपयुक्त अन्नद्रव्यांसह वाहून जात आहेत अशा विविध कारणांमुळे जमिनीचा सुपीकता निर्देशांक कमी होत आहे शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावाच्या शिवारातील जमिनीमध्ये उपलब्ध सुक्ष्म अन्नद्रव्ये व इतर घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत पिकनिहाय किती प्रमाणात द्यायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शक करण्यात आले.
ज्या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळलेली आहे, त्या सुक्ष्म मुलद्रव्ययुक्त खताचा वापर करण्याची शिफारस करणे शक्य होते. खतमात्रांनुसार पिकांना आवश्यक असणा-या अन्नद्रव्यांचे प्रमाण निश्चित करता येते. आपल्या क्षेत्रासाठी किती खत आणणे आवश्यक आहे,त्याचे नियोजन करता येते.
सद्य स्थितीत बाजारामध्ये अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती व त्यामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. यामुळे खतांचा अवाजवी वापर टाळून जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांनी खत वापराच्या शिफारशीचा अवलंब करून ,गांडूळखत,विद्राव्यखते, सूक्ष्मअन्नद्रव्ये ,शेणखत ,कंपोस्ट खत,हिरवळीच्या खतांचा वापर करून रासायनिक खतांच्या वापरामध्ये बचत करता येते या बद्दल सर्व मार्गदर्शन श्री योगेश पाटील बीटीएम आत्मा केज यांनी केले तसेच पिकासाठी खते देण्याची पद्धती व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर खते देताना घ्यावयाची काळजी तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीला बगल देत शेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी वैष्णवी घुले यांनी केले यावेळी तालुका कृषी अधिकारी देशमाने, मंडळ कृषी अधिकारी घुले मॅडम,आत्माचे योगेश पाटील,कृषी सहाययक जाधव, शेकापचे तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे, संभाजी ब्रिगेड चे माझी तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, सरपंच विवेक खोडसे, ग्रामपंचायत सदस्य श्याम खोडसे,पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता मुजमुले,दिलीप भिसे,बाबा खोडसे,मयूर टोम्पे,भया माने,सचिन गुजर,रवी खोडसे, शरद खोडसे, महाराज गिरी सह शेतकरी उपस्थित होते.

