shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'त्या' कामचुकार कोव्हीड तंत्रज्ञावर गंभीर प्रकरणी दंडात्मक कार्यवाही..!!

---------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
तंत्रज्ञा ऐवजी ड्रायव्हरने कोव्हीड तपासणी केल्या प्रकरणी एस. बी.मुथळे या कामचुकार तंत्रज्ञाचे दोन दिवसांचे वेतन कपात करून नंतर असा प्रकार घडल्यास त्याला कायमस्वरूपी सेवा समाप्त करण्यात येणार असल्याची तंबी देण्यात आली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड तपासणी केंद्रात तंत्रज्ञा ऐवजी चक्क एका खाजगी रूग्णवाहिकेचा ड्रायव्हर कोव्हीड तपासणी करीत असल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्या संदर्भात पत्रकार गौतम बचुटे यांनी पोलखोल करून चौकशी केली असता दि. २३ जून रोजी कंत्राटी तंत्रज्ञा ऐवजी वैभव काळे नावाचा खाजगी रूग्णवाहिकेचा ड्रायव्हर हा प्रितम जोगदंड यांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी घशातील स्वॅब घेत असल्याचे निष्पन्न झाले होते. 

त्या संदर्भात  शिर्डी एक्सप्रेस व दै. युवासोबती दि. ३० जून रोजीच्या  वर्तमानपत्राच्या अंकात व इतरही सर्व वर्तमानपत्राच्या ़अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले  होते. या वृत्तामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली. त्याची उपजिल्हा रुग्णालय केजचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय राऊत यांनी तात्काळ दखल घेत सदर कामचुकार कंत्राटी तंत्रज्ञ एस. बी. मुथळे यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे कळविले. त्या संदर्भात एस. बी. मुथळे यांनी केलेला खुलासा हा असमाधानकारक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी कर्तव्यात कसूर करून केलेल्या निष्काळजीपणा बद्दल दोन दिवसाचे वेतन कपात करून पुन्हा असा प्रकार किंवा गैरप्रकार आढळून आल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा संपुष्टात आणण्यात येईल अशी तंबी दिली आहे.

सदर प्रकार म्हणजे "यँँहा कोव्हीड की जाँच टेक्निशियन नहीं कोई और ही करता है l " असे हिंदी सिनेमाच्या डायलॉग सारखे झाले आहे.
close